अभिजीत दराडे, पुणे : राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा, अशी मागणी मनसेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी मनसेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती. पुढच्या चार ते पाच दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात येणार आहे. मनसेच्या या मागणीबाबत समाजाकडून काय प्रतिसाद येतो ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील नागरीक या मागणीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुरुषांच्या हक्कांसाठी आयोग स्थापन करणे या मागणीत काही गैर नाही. पण राज्यात महिला अत्यारांच्या घटना सातत्याने समोर येत असतात. त्यावर कडक कारवाईची मागणी होत असते. असं असताना आता मनसे नेते आशिष साबळे यांच्या पुरुष आयोगाच्या मागणीचा कितपत विचार केला जातो, ते पाहणं महत्त्वाचं आहे.राज्यात पुरुषांचा छळ, खोट्या केसेस दाखल करणे यांसारखे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी राज्य पुरुष आयोगाची गरज असल्याचं मत मनसे नेते आशिष साबळे यांचं आहे. त्यांनी आपल्या या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. देशभरात पुरुषांचा छळ आणि मानसिक अत्याचार याचे प्रमाण 51.5% असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आलं आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
"सध्या पुण्यात गाजणारा कै. ताई हगवणे हा विषय अत्यंत नाजूक व संवेदनशील असून त्या संपूर्ण क्रूरकर्मा कुटुंबावर जन्मठेप हीच शिक्षा देवून त्या वैष्णवी ताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावे. परंतू राज्यात अनेक घटना घडत असून त्यात पुरुषांचाही मानसिक छळ, खोट्या केसेस करणे, तसेच घटस्फोट घेताना लाखोंची, करोडोंची, पोटगी मागणी हे प्रकार सुरू असून पुरुषांना सदर प्रकरणात योग्य दाद मागण्यासाठी व्यासपीठ असावे म्हणून पुरुष आयोग्य स्थापन करावा ही आम्ही मागणी करत आहे.""एकूण पुरुष हिंसाचार आणि मानसिक छळ याचे एकंदर प्रमाण हे ५१.५% असून पुरुषांना ना पोलीस, ना कोर्ट, कुठेही थारा मिळत नाही. कारण जवळपास सर्व कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत. याचा तत्काळ विचार करावा. या मागणीस सकारात्मकपणे पाहून अंमलबजावणी करावी."from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fJUldVx
No comments:
Post a Comment