Breaking

Wednesday, May 7, 2025

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर पत्नी रितिका झाली इमोशनल, पोस्ट करताना सर्वांचीच मनं जिंकली.. https://ift.tt/7HNATGl

मुंबई : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अखेर निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या निवृत्तीनंतर बऱ्याच जणांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. पण रोहित शर्माची पत्नी मात्र या निर्णयानंतर चांगलीच भावूक झाली आहे. रोहितच्या पत्नीने आता सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांचीच मनं जिंकली आहेत.रोहित शर्माने बुधवारी संध्याकाळी तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का बसला. सुरुवातीला रोहितने आयपीएलमधू निवृत्ती घेतली असेल, असे वाटत होते. पण रोहित शर्माची पोस्ट समोर आली आणि त्यानंतर चाहत्यांना तो आता कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. रोहितच्या निवृत्तीनंतर बरीच चर्चा झाली, काही जणांनी गौतम गंभीर यांना यासाठी दोषी ठरवले. पण रोहितच्या निवृत्तीनंतर आता रितिका चांगलीच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आणि ही गोष्ट तिच्या पोस्टमधूनच पाहायला मिळत आहे.रोहित शर्माची पत्नी ही सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि तिच्या पोस्ट या चांगल्याच व्हायरल होतात. कारण तिच्या पोस्टमध्ये काही तरी अर्थ दडलेला असतो. आता रोहित शर्माने निवृत्ती पत्करल्यावर रितिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट करत असताना रितिकाला कुठलाही वाद होऊ नये, असे वाटत असावे आणि त्यासाठीच तिने एक शक्कल लावून ही पोस्ट केली आहे. रितिकाने यावेळी रोहित शर्माने जी पोस्ट केली आहे, तीच रिशेअर केली आहे. यामधून आपण रोहित शर्माच्या या निर्णयाचा सन्मान करतो आणि त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे कोणतेही शब्द नाहीत, असा अर्थ रितिकाच्या या पोस्टमधून निघत आहे. कारण रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत जर रितिकाने काही म्हटले असते, तर त्यानंतर वाद होऊ शकला असता. कारण रितिकाही नेहमीच स्पष्ट बोलते. त्यामुळे वाद टाळण्यासाठी रितिकाने रोहितच्या या निर्णयाला पाठिंबा देत त्याचीच पोस्ट रिशेअर केली आहे.रोहित शर्माला पत्नी रितिकाचा चांगलाच पाठिंबा असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या या निर्णयानंतर रितिकाने त्याचीच पोस्ट करत एक चांगली गोष्ट केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Pf49dOe

No comments:

Post a Comment