Breaking

Thursday, May 8, 2025

भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत स्टेटमेंट जारी, पाहा नेमकं काय म्हटलं आहे? https://ift.tt/wadCX5s

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानची कुरापत हाणून पाडली आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले आहेत. या घटनेनंतर संरक्षण मंत्रालयाकडून 'एक्स'वर अधिकृतपणे माहिती जारी करण्यात आली आहे. "जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर आज जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्ताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. भारताने सर्व हल्ले निष्क्रिय केले आहेत. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा भौतिक नुकसान झालेले नाही. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या जनतेची सुरक्षेशाठी पूर्णपणे सज्ज आहे", असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने देशभरातील सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. टर्मिनल इमारतींमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार एअर मार्शल तैनात केले जातील, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहेत. यानंतर अकासा एअर विमान कंपनीकडून 'एक्स'वर प्रवशांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. असाका अइरलाइन्सने प्रवाशांना चेक-इन आणि बोर्डिंग पाससाठी विमानतळावर 3 तास आधी येण्याचं आवाहन केलं आहे.प्रवेश करण्यासाठी तुम्ही वैध सरकार-मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्रे बाळगा. तुमच्या चेक-इन बॅगेज व्यतिरिक्त, 7 किलो वजनाची फक्त एक हँडबॅग परवानगी असेल. नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व प्रवाशांना बोर्डिंग करण्यापूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असेल, असं अकासा एअर विमान कंपनीने म्हटलं आहे.

अमित शाह यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

या घडामोडी पाहता नवी दिल्लीत घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालकांशी सीमा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी विमानतळ सुरक्षेबाबत सीआयएसएफच्या महासंचालकांशीही चर्चा केली. तसेच देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयासोबतची चर्चा झाल्यची माहिती आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uwaV9At

No comments:

Post a Comment