मुंबई- बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री होत्या ज्या त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर चांगली कामगिरी करत होत्या. पण अंडरवर्ल्ड डॉनशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले. मग त्या मंदाकिनी असो किंवा मोनिका बेदी. अशीच आणखी एक अभिनेत्री होती, जिचा ६० आणि ७० च्या दशकात मोठा प्रभाव होता. पण तिने एका अंडरवर्ल्ड डॉनशी लग्न केले. तिचा नवरा मुंबई बॉम्बस्फोटात दोषी आढळला. मात्र पतीच्या मृत्यूनंतर ही अभिनेत्री अशा प्रकारे गायब झाली की कोणालाही तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. ही अभिनेत्री कोण आहे? ओळखलं का? तिचे वडील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते आणि आई निगार सुलताना देखील एके काळातील लोकप्रिय नायिका होत्या. पतीच्या निधनानंतर ती विधवेचे जीवन जगू लागली. १९७१ मध्ये, तिच्या वडिलांचे निधन झाले आणि तिने चित्रपटांमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. वडिलांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत तिचा संघर्ष सुरू झाला. रिपोर्ट्सनुसार, इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक होते ज्यांना ही अभिनेत्री आवडत नव्हती. 'मुगल-ए-आझम'चे दिग्दर्शक असिफ यांची मुलगी या अभिनेत्रीचे नाव होते, त्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते के. आसिफ यांची मुलगी आहे. 'मुघल-ए-आझम' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी आसिफ प्रसिद्ध होते. हिना कौसरला तिच्या आईसारखी अभिनेत्री व्हायचे होते आणि म्हणूनच तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. १९७० मध्ये अभिनयात पदार्पण, अमिताभ बच्चनसोबत काम , अंडरवर्ल्ड डॉनशी लग्न केले यांनी 1970 मध्ये 'होली आयी रे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर एका वर्षानंतर, त्यांचे वडील के. आसिफ यांचे निधन झाले. हिनाला खूप धक्का बसला, पण त्यांनी यातून स्वतःला सावरले, आणि मग चित्रपटांमध्ये काम करत राहिल्या. त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अदालत' चित्रपटात दिसल्या. यामध्ये त्यांनी अमिताभ यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात वहिदा रहमानही होत्या. यानंतर १९९१ मध्ये हिना कौसरने अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी लग्न केले. हिना ही इक्बाल मिर्चीची दुसरी पत्नी होती. पती पळून गेल्यावर हिना कौसरही देश सोडून गेली पण जेव्हा मुंबई बॉम्बस्फोटात इक्बाल मिर्चीचे नाव आले तेव्हा तो भारतातून पळून गेला. यानंतर हिना कौसरनेही देश सोडला. दोघे नंतर लंडनला पळून गेले. पतीचा मृत्यू झाला, आता एकटीच आयुष्य जगतेय... २०१३ मध्ये इक्बाल मिर्ची यांचे निधन झाले आणि हिना कौसर विधवा झाल्या. तेव्हापासून १२ वर्षे झाली पण हिना यांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. विकिपीडियानुसार त्या युनायटेड किंग्डममध्ये राहतात तेही एकट्या. त्यांना मुलंही नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/h7eJnWs
No comments:
Post a Comment