सोलापूर : सोलापुरातून आज पुन्हा () एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोन तरुणांचा (Youth Dies of Suffocation) मृत्यू झाला आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे ही घटना घडली आहे. युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्याची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघेजण गेले होते, यातील दोघांचा टाकी साफ करताना श्वास गुदमरल्याने दुर्दैवी अंत झाला आहे वृत्तानुसार, तिघे कामगार कामासाठी दुपारच्या सुमारास तेथे पोहोचले. काम सुरु करण्याआधी टाकी साफ करण्याचं अॅसिड त्यात टाकलं होतं. त्यानंतर काही वेळाने टाकी साफ करण्यासाठी एक जण खाली उतरला आणि त्याचा श्वास कोंडला, यात बेशुद्ध झाला. त्याचा प्रतिसाद येत नसल्याने इतर दो कामगार देखील टाकीत उतरले. मात्र त्यांना श्वास कोंडल्याचा त्रास झाला. त्यानंतर त्यातील एक तात्काळ बाहेर पडला म्हणून त्याचा जीव वाचला. मात्र दोघांना बाहेर पडता न आल्याने आपला जीव गमवावा लागला. सागर नारायण कांबळे २० वर्षे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी २८ वर्षे असे मृत तरुणांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहांना बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हे तिघे कामगार गेले होते. परंतु त्यांची एक चूक त्यांच्या जीवावर बेतली आहे. अॅसिडमुळे त्यांचा श्वास कोंडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन तरण्याबांड मुलांचा मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान शुक्रवारी देखील सोलापुरात मनाला चटका लावणारी घटना घडली होती. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील एका शेतात शालेय विद्यार्थी विहिरीत पोहायला गेले होते. परंतु काळ उभा ठाकला. विहिरीचा कठडा अचानक कोसळला आणि दोन मुलं त्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. तर पोहायला उतरलेल्या इतर काही मुलांचा जीव वाचला आहे. रात्री उशिरापर्यंत दबलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु होते. अखेर दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. लहानग्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vFJGxhw
No comments:
Post a Comment