Breaking

Friday, May 2, 2025

'मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो योग...' अजित पवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद https://ift.tt/JeDoytY

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी () आज पुन्हा मुख्यमंत्री पदाची () इच्छा बोलवूनदाखवली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. 'महिलांना संधी मिळाली पाहिजे. लाडक्या बहिणीसाठी चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. आज महिलांचा गौरव करत आहोत, हे सांगतानाच महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले आहे. आम्ही पण अनेक महिलांना संधी देण्याचे काम करत आहोत हे देखील अजित पवार यांनी नमूद केले आहे. यावेळी पवारांनी ज्या महिलांचा सन्मान केला त्यांच्याविषयी इत्यंभूत माहितीही दिली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभ्या केल्या व या राज्याला सुसंस्कृत राजकारण दिले त्यांचा वारसा घेऊन काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. अनेक महिलांचे कर्तुत्व राज्याने पाहिले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावे, मनभेद होता कामा नये, असे सांगतानाच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात ज्यांनी योगदान दिले, त्यांचा उद्या गौरव करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. तुम्हाला सन्मानित करताना आम्हाला अभिमान आहेच शिवाय तुमच्या पुरस्काराने आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी देखील कर्तुत्ववान महिलांचा गौरव केला. 'तुम्ही महाराष्ट्राचे नाव मराठी संस्कृतीची एक जगभरात ओळख निर्माण केली आहात. मात्र राजकारण्यांची ओळख कलाकार म्हणून केली जाते. कारण सकाळ, दुपार, संध्याकाळी आमच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. परंतु तुम्ही कलाकार आपल्या अभिनयाने त्या भूमिका दाखवून देत आहात. त्याबद्दल सुनील तटकरे यांनी कलाकारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9vw1LjK

No comments:

Post a Comment