Breaking

Saturday, June 28, 2025

15 वर्षाच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर कारमध्ये नको ते घृणास्पद कृत्य, तरुणाला अटक https://ift.tt/rGAfhtN

: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून युवकाने कारमध्ये 15 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केला. याप्रकरणी सदर पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. सुमित ऊर्फ साहिल मनोहर चंदेल असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो वाहनचालक आहे. तर पीडित मुलगी दहावीत शिकते. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात एका लग्नात मुलीची सुमितसोबत ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. काही दिवसांपूर्वी सुमितने इस्टाग्रामवर तिला मेसेज केला. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. पीडित अल्पवयीन मुलगी २१ जूनला मोबाईलवर सुमितसोबत बोलत होती. सतत मोबाईलवर बोलत असल्याने नातेवाईक तिला रागावले. दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुमितने तिच्याशी संपर्क साधला. तिला गड्डीगोदाम चौकात भेटायला बोलाविले. मुलगी तेथे आली. सुमित तिला कारने बेलतरोडीतील निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीने कशीबशी सुटका केली. ती मनीषनगर परिसरात आली. पीडितेने एका युवकाकडील मोबाइलवरुन नातेवाइकांशी संपर्क साधला. नातेवाइक तेथे गेले. तिला घेऊन घरी आले. त्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलत्कार आणि अपहरणाचा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संदिया सोमनकर यांनी शोध घेऊन सुमितला केली.

दोन तास होता गायब

घटनेच्या दिवशी सुमित हा कामावरुन दुपारी ३ वाजता गायब झाला. तो सायंकाळी ५ वाजता परतला. पोलिसांनी त्याला अटक केली असता आपण मुलीला भेटलोच नाही,असे त्याने सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो दोन तास मालकाच्या घरून गायब होता, हे स्पष्ट झाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OlrMqi4

No comments:

Post a Comment