Breaking

Sunday, June 29, 2025

अनंत अंबानींना मिळाली मोठी जबाबदारी; वर्षाला मिळणार 200000000 रुपये, RIL च्या नफ्यातही हिस्सा https://ift.tt/Wc0gSYF

मुंबई : यांचे धाकटे पुत्र यांच्यावर इंडस्ट्रीजमध्ये (RIL) आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते आता RIL मध्ये एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर बनले आहेत. त्यांना वर्षालाृ 20 कोटींपर्यंत रुपये पगार मिळणार आहे. सोबतच, कंपनीच्या नफ्यातही त्यांना वाटा मिळणार आहे. कंपनीने भागधारकांना पाठवलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. अनंत अंबानी यांना अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतील. अनंत अंबानी यांना एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर बनवल्याने कंपनीला नक्कीच फायदा होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.उत्तराधिकारीअनंत अंबानी यांची नियुक्ती रिलायन्सच्या उत्तराधिकार योजनेतला महत्त्वाचा भाग आहे. मागील वर्षी अनंत आणि त्यांचे भाऊ आकाश आणि बहीण ईशा यांना आरआयएल बोर्डात नॉन-एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर म्हणून सामील करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना कंपनीकडून पगार मिळत नव्हता. पण, त्यांना प्रत्येक मीटिंगसाठी 4 लाख रुपये आणि 2023-24 या वर्षासाठी 97 लाख रुपये कमीशन मिळालं होतं.अनंत हे पहिले व्यक्तीअनंत हे त्यांच्या भाऊ बहिणींमध्ये पहिले व्यक्ती ठरले, ज्यांना एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आलं. ते रिलायन्सच्या ऊर्जा व्यवसायावर जास्त लक्ष देणार आहेत. यामध्ये तेल शुद्ध करण्यापासून ते कंपनीच्या नवीन ऊर्जा आणि रिन्यूएबल एनर्जीच्या कामापर्यंतचा समावेश आहे. कंपनीने पत्रकात म्हटलं आहे की, "ते 2015 पासून रिलायन्स ग्रुपचा भाग आहेत आणि मागील एका दशकात त्यांनी ऑइल-टू-केमिकल (O2C) अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. यात कच्च्या तेलाची खरेदी, रिफाइनरी आणि डाउनस्ट्रीम युनिट ऑपरेशन आणि उत्पादनांचा पुरवठा आणि ट्रेडिंग यांचा समावेश आहे."इतर जबाबदाऱ्याकंपनीने पुढे सांगितलं की, "मोठ्या प्रकल पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. विनाइल चेन आणि स्पेशलिटी पॉलिस्टरसोबतच न्यू एनर्जी गीगाफॅक्ट्रीजमध्ये सुरू असलेल्या O2C प्रकल्पाचे, नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेखीत ते सहभागी आहेत." ब्राउन विद्यापिठातून शिक्षण घेतलेले अनंत जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डमध्येही आहेत. ते रिलायन्स फाउंडेशनशीही जोडलेले आहेत आणि वन्यजीव बचाव आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या वनतारा प्रकल्पासाठी ते ओळखले जातात. वनतारा म्हणजे प्राणी आणि निसर्गाची काळजी घेणारा प्रकल्प.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZlmaiQ8

No comments:

Post a Comment