नवी दिल्ली : कॅनडाने अखेर भारताला G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. कॅनडाचे यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. तर दोन्हीही देशांनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबाबत चर्चा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांचे निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले आहे. ट्विटमधून त्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांशी झालेल्या फोन संभाषणाची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी फोनवर बोलून आनंद झाला. मार्क यांनी अलिकडच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिले की, या महिन्याच्या अखेरीस कानानस्किस येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेत आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.पंतप्रधान मोदींनी असेही नमूद केले की, लोकांमधील खोल संबंधांनी बांधले गेलेले चैतन्यशील लोकशाही देश म्हणून, भारत आणि कॅनडा हे परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांच्या मार्गदर्शनाखाली नव्या जोमाने एकत्र काम करणार आहेत. शिखर परिषदेत भेटण्याची आम्हाला उत्सुकता आहे.अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या देशांचा समावेश असणाऱ्या G7 परिषदेला भारताचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग पाच वर्षे G7 शिखर परिषदेला हजेरी लावली. पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंच्या कार्यकाळात भारत-कॅनडातील द्विपक्षीय संबंध ताणले गेले. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात संबंध ताणले गेले. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतरची ही पहिलीच शिखर परिषद असल्याने याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ctlx4OU
No comments:
Post a Comment