मुंबई- टीव्हीवरील मालिका पाहताना त्यातली नायिका ही प्रेक्षकांना नेहमीच घरातलीच सदस्य वाटते. कधी ती अभिनेत्री अचानक टीव्हीवरुन नाहीशी जरी झाली तरी प्रेक्षकांमधली तिची क्रेझ काही कमी होत नाही. अभिनेत्री दीपिका कक्कर ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिने 'ससुराल सिमर का' आणि 'कहाँ हम कहां तुम' या मालिकांमध्ये दमदार अभिनय केला होता. तिच्या लोकप्रियतेमुळे तिने 'बिग बॉस 12' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला तेव्हा तिला तिच्या चाहत्यांचा संपूर्ण सीझनमध्ये पाठिंबा मिळाला. त्यामुळेच ती विजेती बनली. मात्र सध्या तिच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाच्या लिव्हरमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले. तिचे पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने एक व्लॉग शेअर केला होता. तेव्हा त्याने अभिनेत्रीच्या तब्येतीबद्दल सांगितले. दीपिकाला पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता. जो अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर कमी व्हायचा. सीटी स्कॅन केल्यानंतर, तिच्या लीव्हरच्या डाव्या बाजूला एक खूप मोठी गाठ आढळली, जी जवळजवळ टेनिस बॉलइतकी मोठी होती. त्यानंतर तिला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर असल्याचे उघड झाले. दीपिकाची 14 तासांची सर्जरी झाली. तिच्या पतीने चाहत्यांना तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. टीव्हीवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासाठी तिच्या शानदार कारकिर्दीचा त्याग केला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, दीपिकाने तीन वर्षे फ्लाइट अटेंडंट म्हणून काम केले. २०१० मध्ये, तिने 'नीर भरे तेरे नैना' या मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'अगले जनम मोहे बिटिया ही किजो' मध्ये दिसली. मात्र, 'ससुराल सिमर का' मधील 'सिमर' या भूमिकेने तिला घराघरात प्रसिद्धी मिळवून दिली. दीपिकाने 'ससुराल सिमर का' मध्ये ६ वर्षे काम केले आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली. दीपिकाने या मालिकेच्या प्रति एपिसोडसाठी 70,000 रुपये घ्यायची. त्यामुळेच ती टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली. २०११ मध्ये दीपिकाने रौनक सॅमसनशी लग्न केलेपण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 'ससुराल सिमर का' मालिकेदरम्यान दीपिकाची भेट शोएब इब्राहिमशी झाली. घटस्फोटादरम्यान शोएबने दीपिकाला साथ दिली आणि ते चांगले मित्र बनले. इब्राहिमची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी २०१८ मध्ये, निकाह केला. हे लग्न अगदी खासगी होते. आंतरधर्मीय विवाहासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून फैजा असे ठेवले. 2023 मध्ये दीपिकाने गरोदर असल्याचे सर्वांना सांगितले. पण २०२२ मध्ये दीपिकाचा गर्भपात झाला. शोएबने खुलासा केला की दीपिका सहा आठवड्यांची गर्भवती होती जेव्हा तिचा गर्भपात झाला आणि त्याचा तिच्यावर खूप वाईट परिणाम झाला. पुढे 2023 मध्ये त्यांनी मुलगा रुहानला जन्म दिला. 2019 मध्ये दीपिकाने 'कहां हम कहां तुम' या शोमध्ये काम केले, पण हा शो जास्त काळ चालला नाही आणि दीपिकाही पडद्यावरून गायब होऊ लागली. मुलगा रुहानच्या जन्मानंतर दीपिकाने तिचे करिअर सोडले आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये भाग घेतला होता, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे तिने शो अर्ध्यावरच सोडला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8GeM7vg
No comments:
Post a Comment