Breaking

Monday, June 9, 2025

विनोद कांबळी सुधारला, फिट झाला, नवीन लूक होतोय व्हायरल ,हेल्दी फूड ते हिरवा गॉगल, पाहा फोटो... https://ift.tt/CbvEyqH

मुंबई : विनोद कांबळीची काही दिवसांपूर्वीची अवस्था केविलवाणी अशीच होती. कारण विनोदला आपल्या पायांवर नीट चालताही येत नव्हतं. पण आता विनोद कांबळीचा एक नवीन लूक समोर आला आहे. विनोद यामध्ये चांगलाच फिट झाल्याचे दिसत आहे. विनोदने आता आपला नवीन लूक सर्वांसमोर आणला आहे. कारण यावेळी विनोद कांबळीने परीधान केलेला हिरवा गॉगल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.विनोद कांबळी काही महिन्यांपूर्वी प्रकाशझोतात आला जेव्हा आचरेकर सरांचा कार्यक्रम शिवाजी पार्कच्या मैदानात होता. या कार्यक्रमात सचिन तेंंडुलकर विनोदला भेटण्यासाठी गेला आणि विनोदने आपली काय अवस्था करुन घेतली आहे, हे त्याला पाहिल्यावर सर्वांनाच वाटले. कारण सर्वांनीच धडाकेबाज विनोद कांबळी मैदानात पाहिला होता, ज्याने शेन वॉर्नसारख्या गोलंदाजाला घाम फोडला होता. पण यावेळी विनोदची अवस्था कोणालाही पाहवत नव्हता. त्यानंतर विनोदच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. त्यानंतर विनोदला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.विनोद कांबळीची प्रकृती अचानक बिघडली होती आणि त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी विनोदला सुरुवातीला आपल्या पायावर चालताही येत नव्हते. पण विनोदवर चांगले उपचार झाले आणि आता तो आपल्या पायावर उभा राहू शकतो. एवढंच नाही तक विनोद आता पूर्णपणे फिट झाला आहे आणि तो एका रेस्टॉरंटमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी विनोद कांबळीचा भन्नाट लूक समोर आला आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला आहे आणि त्यावर चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे विनोद कांबळीचा हा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. विनोदने यावेळी आदिदासचं टीशर्ट परीधान केलं आहे, तर हिरव्या रंगाचा गॉगल त्याच्यावर चांगलाच उठून दिसत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो यावेळी हेल्दी फूडही खात असल्याचे समोर आले आहे. विनोद कांबळीची वाईट अवस्था झाली होती. तो व्यसनांच्या आहारी गेला होता. पण आता तो सुधारला आहे आणि फिट झाल्याचे दिसत आहे. विनोद कांबळीचा हा नवीन लूक चांगलाच व्हायरल झाल्याचे आता सर्वांनाच पाहायला मिळत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WhmOzFk

No comments:

Post a Comment