Breaking

Tuesday, June 10, 2025

स्वस्त कपडे, जुनी कार.., जगातली सर्वात तरुण अब्जाधीश जगते अत्यंत साधं जीवन, वाचाल तर वायफळ खर्च करणं टाळाल https://ift.tt/O4ENwjg

वॉशिंग्टन: अमेरिकेतील उद्योजिका लूसी गुओ यांनी लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टला मागे टाकत जगातील सर्वात कमी वयाची सेल्फ-मेड महिला होण्याचा मान मिळवला आहे. 30 वर्षीय लूसी गुओ यांची एकूण संपत्ती सुमारे 1.3 अब्ज डॉलर्स (11,000 कोटी रुपयांहून अधिक) आहे. 'स्केल एआय'मधील त्यांची 5% भागीदारी हे त्यांच्या संपत्तीचे मुख्य कारण आहे. विशेष म्हणजे, इतकी प्रचंड संपत्ती असूनही लूसी गुओ यांचा खर्च आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांप्रमाणेच आहे. त्या अनावश्यक खर्च टाळतात आणि बचतीला अधिक महत्त्व देतात. लूसी गुओ यांनी 2016 मध्ये अलेक्जेंडर वांग यांच्यासोबत 'स्केल एआय'ची स्थापना केली. ही कंपनी एआय ॲप्लिकेशन्सला प्रशिक्षण देण्यासाठी लेबल डेटा पुरवते. तसेच, स्वायत्त वाहन, आरोग्य सेवा आणि ई-कॉमर्स यांसारख्या विविध उद्योगांनाही सेवा पुरवते. दुसऱ्या इयत्तेतच कोंडिंग शिकायला सुरूवात गुओ यांचे आई-वडील दोघेही इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच गुओ यांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले.गुओ यांनी दुसऱ्या इयत्तेपासूनच कोडिंग शिकायला सुरुवात केली.किशोरावस्थेत असताना त्यांनी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी बॉट तयार करण्यास सुरुवात केली. याच गोष्टीने त्यांच्या भविष्यातील एआय क्षेत्रातील कारकिर्दीचा पाया रचला. स्केल एआयच्या यशाने लूसी गुओ यांच्या संपत्तीत मोठी भर घातली आहे. वाढते मूल्यांकन आणि एआय विकासासाठी डेटा पुरवण्यातील तिची महत्त्वपूर्ण भूमिका यामुळे गुओ अब्जाधीश बनल्या आहेत. जुनी कार, स्वस्त कपडेआपली अपार संपत्ती असूनही गुओ आश्चर्यकारकपणे किफायती जीवनशैली जगतात. त्या डिस्काउंट वेबसाइटवरून कपडे खरेदी करणे पसंत करतात." गुओ स्वस्त उत्पादने विकणाऱ्या 'शीन' या वेबसाइटवरून कपडे करतात आणि अनेकदा एकच पोशाख अनेकवेळा परिधान करतात. त्या अजूनही जुनी होंडा सिव्हिक चालवतात आणि सामान्यतः इकोनॉमी क्लासमधून प्रवास करतात. केवळ लांबच्या प्रवासासाठी त्या बिजनेस क्लास निवडतात.प्रायव्हेट जेटमध्ये त्यांना अजिबात रस नाही. एकूण संपत्ती 11 हजार कोटी गुओ यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि मूल्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सवयीमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.गुओची एकूण सुमारे 1.3 अब्ज डॉलर्स (11,000 कोटी रुपयांहून अधिक) आहे आणि 'स्केल एआय'मधील त्यांची 5% भागीदारी हे त्याचे मुख्य कारण आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/skctOSV

No comments:

Post a Comment