लंडन : विराट कोहली आता भारताच्या कसोटी संघात नाही, पण तरीही भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर त्याचा पिच्छा काही केल्या सोडताना दिसत नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु असताना दुसऱ्या दिवशीही सर्वांसमोर खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले.ही गोष्ट घडली ती ३४ व्या षटकात. त्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा गोलंदाजी करत होता. सिराजचा सामना यावेळी करत होता तो इंग्लंडचा सर्वात अनुभवी खेळाडू जो रुट. भारतासाठी जे रुटची विकेट सर्वात महत्वाची होती, कारण तो एकदा का स्थिरस्थावर झाला की, मोठी खेळी साकारतो, हे सर्वांनाच माहिती आहे. मोहम्मद सिराजने यावेळी या षटकाच्या पाचव्या चेंडूवर. सिराजने यावेळी असा वेगवान चेंडू टाकला की, त्याची तोड रुटकडे नव्हती. त्यामुळे रुट यावेळी फसला. रुटच्या पायावर हा चेंडू आदळला आणि भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केली. त्यावेळी पंचांनी रुटला बाद दिले.पंचांनी रुटला बाद दिल्यावर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यावेळी भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी गिलचे सेलिब्रेशन हे विराट कोहलीसारखे होते. कारण गिलमध्ये तसाच आक्रमकपणा दिसत होता आणि ती एका हाताची स्टाइलही होती. पण संजय मांजरेकर यांनी यावेळी विराट कोहलीची खिल्ली उडवली. संजय मांजरेकर म्हणाले की, " मला हे सेलिब्रेशन पाहिल्यावर तीन जणांची आठवण येते. रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, अजित वाडेकर असं सेलिब्रेशन करायचे. अजिंक्य रहाणेही असं सेलिब्रेशन करायचा. पण मला अजून कोणता खेळाडू आठवत नाही की, जो असं सेलिब्रेशन करायचा. " संजय मांजरेकर यांनी यावेळी विराट कोहलीची खिल्ली उडवली. कारण रोहित, सचिन, वाडेकर किंवा अजिंक्य यापैकी कोणीही असं सेलिब्रेशन करत नव्हते. पण कोहलीचं नाव घ्यायचं त्यांनी यावेळी टाळलं आणि उगाच वाद नको म्हणून बाकीच्या समालोचकांनीही विराटचं नाव घेतलं नाही. पण सामना सुरु असताना असं कोणी करतं का, असा सवाल आता चाहते विचारायला लागले आहेत.विराटवर संजय मांजरेकर यांनी यापूर्वीही टीका केली होती. त्यावेळी विराटच्या चाहत्यांनी त्यांना उत्तर दिले होते. पण तरीही संजय मांजरेकर यांनी त्यानंतरही विराट कोहलीची खिल्ली उडवली. विराट तर आता कसोटी क्रिकेटही खेळत नाही, त्यामुळे मांजरेकर यांना हे करण्याची काय गरज होती, असा प्रश्न आता चाहते विचारायला लागले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7s5vk6V
No comments:
Post a Comment