मुंबई: स्टार प्रवाहवर येत्या 23 जूनपासून '' हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी या कार्यक्रमाची टीम देहू आणि आळंदी याठिकाणी पोहोचली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते निर्माते आदेश बांदेकर करत असून त्यांचे देहू-आळंदीमधून काही व्हिडिओही समोर आले आहेत. त्यांच्यासह स्टार प्रवाहच्या मालिकांमधील काही कलाकारही सहभागी झाले होते. आळंदी याठिकाणी भक्तीरसात रममाण झालेल्या 'अर्जुन' आणि 'सत्या' यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
सत्या-अर्जुनने केला हरीनामाचा गजर
19 जून रोजी ''ची टीम आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पोहोचली. यावर्षी ज्ञानेश्वर माऊलींचा 750 वा जन्मउत्सव असल्याने, यंदाचे वर्ष आणखी खास आहे. यावेळी 'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन (अभिनेता अमित भानुिशाली) आणि 'साधी माणसं'मधील सत्या (अभिनेता आकाश नलावडे) सहभागी झाले होते. अमित आणि आकाश वारीमध्ये वारकऱ्यांप्रमाणेच रमले होते. टाळ-वीणा हाती घेऊन ते हरीनामाचा गजर करताना दिसले. 'आळंदी येथे वारकरी संप्रदायाबरोबर विठू नामाच्या गजरात तल्लीन झाले सत्या आणि अर्जुन', असे म्हणत स्टार प्रवाह वाहिनीकडून त्यांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याआधी अर्जुन-सत्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला. याठिकाणी ते गर्दीतून एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासह आदेश बांदेकरही आहेत. त्यावेळी पावसाचेही आगमन झाल्याने रेनकोट घालून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विशेष कौतुक होते आहे. 23 जूनपासून 'माऊली महाराष्ट्राची' हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात अर्जुन-सत्याने वारीमध्ये अनुभवलेले हे क्षण प्रेक्षकांनाही अनुभवता येतील. आळंदी-देहूपासून थेट पंढरीपर्यंतचा वारकऱ्यांचा प्रवास या कार्यक्रमात पाहता येणार असून, दररोज संध्याकाळी 6:00 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमातून यांनीही दीर्घकाळाने टीव्हीवर पुनरागमन केल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/P0qkURv
No comments:
Post a Comment