Breaking

Tuesday, June 3, 2025

विराट कोहली ठरला असता आरसीबीचा व्हिलन, सामना सुरु असताना कोणती घडली होती मोठी चूक, पाहा... https://ift.tt/DxBnlge

अहमदाबाद : विराट कोहलीकडून आयपीएलच्या फायनलमध्ये मोठी चूक घडली होती. त्यामुळे फायनलमध्ये जर आरसीबी पराभूत ठरली असती, तर विराट कोहली हा पराभवाचा व्हिलन ठरला असता. विराट कोहलीकडून अशी चूक घडली होती की, त्याला माफी मिळालीच नसती.विराट कोहलीसाठी हा सामना सर्वात महत्वाचा होता. कारण गेल्या १७ वर्षांत विराटला एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आली नव्हती. पण यावेळी विराट कोहलीला ट्रॉफी उंचावण्याची सुवर्णसंधी होती. त्यामुळे विराट कोहली या सामन्यात सावधपणे खेळत होता. आरसीबीचे बाकीचे फलंदाज मोठे फटके मारत होते. पण विराट कोहली मात्र सावधपणे एखाद-दुसरी धाव घेत होता. त्यामुळे विराट कोहलीने जरी ४३ धावा केल्या असल्या तरी त्यामध्ये फक्त तीनच चौकारांचा समावेश होता, यावरून विराट कोहली किती सावधपणे खेळत होता, हे समजता येऊ शकते.टी २० क्रिकेटमध्ये धावगती ही सर्वात महत्वाची असते. कारण किती कमी चेंडूंत किती जास्त धावा करता येतात, ही महत्वाची गोष्ट असते. पण विराट कोहली या आयपीएलच्या फायनलमध्ये कसोटी क्रिकेट खेळत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एकेकाळी आरसीबीचा संघ हा दोनशे धावा सहजपणे करेल, असे वाटत होते, पण विराट कोहलीच्या फलंदाजीमुळे आरसीबीच्या धावगतीला खीळ बसत होती. विराट कोहली अर्धशतक करेल आणि त्यानंतर मोठी फटकेबाजी करेल, असे सर्वांना वाटत होते. विराट अर्धशतकाच्या जवळ आलाही होता. पण त्यावेळी त्याने एक मोठी चूक केली. सावधपणे खेळणाऱ्या विराट कोहलीला मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद ठरला. विराटच्या या चुकीचा फटकाही आरसीबीच्या संघाला चांगलाच बसला. कारण एकतर तो सावधपणे खेळत होते, अर्धशतक न झाल्यामुळे त्याने मोठी फटकेबाजीही केली नाही. त्यामुळे विराट हा आरसीबीच्या पराभवाचा व्हिलन ठरला, अशी जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये सुरु होती.विराट कोहलीने या सामन्यात संघाकडून सर्वाधिक धावा केल्या खऱ्या, पण सर्वात जास्त चेंडूही त्याने खेळले. त्यामुळेच आरसीबीला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नसल्याचे समोर आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SDPdGQC

No comments:

Post a Comment