मुंबई: अभिनेत्री करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती यांचे 12 जून 2025 रोजी निधन झाले. वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जीव गमावला. पोलो सामन्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याच समोर आले आहे. आता सूत्रांच्या माहितीनुसार, असे म्हटले जाते आहे की, त्यांचे अंत्यसंस्कार होण्यास विलंब होऊ शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारे नागरिकत्व! यांच्याकडे अमेरिकी नागरिकत्व होतं आणि यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारांकरिता उशीर होऊ शकतो. एनडीटीव्हीने याविषयी वृत्त दिले आहे. कुटुंबाच्या एका जवळच्या सूत्रांनी याविषयी माहिती दिली. या माहितीनुसा, संजय यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते आणि त्यांचे निधन लंडनमध्ये झाले. त्यामुळे त्यांचे शव भारतात आणण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर प्रक्रिया खूपच गुतागुंतीची आहे.संजय यांचे सासरे अशोक सचदेव यांनी अशी माहिती दिली की, यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिल्लीमध्ये होतील. त्यांनी म्हटले की, 'पोस्टमार्टम अजून सुरू आहे. कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी भारतात आणले जाईल.' 13 जून रोजी उशीरा रात्री ही प्रतिक्रिया समोर आली होती.
पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन
संजय यांच्या मृत्यूविषयी असे अपडेट समोर आले होते की, ते गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलोचा सामना खेळत होते. संजय यांची ऑरियस ही टीम आणि प्रतिस्पर्धी सुजान या संघांमध्ये हा सामना सुरू होता. तेव्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि चालू सामन्यातच त्यांचा श्वास कोंडू लागला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, खेळ मध्येच सोडून ते मैदानाबाहेर गेले, त्यानंतर लगेचच हृदयविकाच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय कपूर यांनी त्या खेळादरम्यान एक मधमाशी गिळली होती आणि डंख मारला गेल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही.दरम्यान उद्योगपती संजय कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रिया सचदेव आणि मुलगा अझारियास असे कुटुंब आहे. प्रिया त्यांची तिसरी पत्नी होती. त्यांनी नंदिता महतानी यांच्याशी पहलि लग्न केले होते, 2000 दशकाच्या सुरुवातीच्या काही वर्षात ते एकत्र होते. हे नातं संपल्यानंतर 2003 मध्ये त्यांचे करिष्मासोबत लग्न झाले, पण 2016 साली त्यांचा घटस्फोट झाला. करिष्मा आणि संजय यांना समायरा आणि कियान नावाची दोन मुले आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fCq8eIv
No comments:
Post a Comment