Breaking

Saturday, June 14, 2025

मागवला फॅन अन् आल्या चक्क विटा , पालीतील शिक्षकाची ऑनलाईन फसवणूक https://ift.tt/NgmsGeJ

अमुलकुमार जैन, रायगड : ऑनलाईन खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते, याचा प्रत्यय पालीत आला आहे. येथील जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकांनी 9 जूनला फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंगवर सिलिंग फॅन मागवला होता. मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या. यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड करण्यात आले. या फसवणुकी संदर्भातील व्हिडिओ जनार्दन भिलारे यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे. जनार्दन भिलारे यांनी फ्लिपकार्टवर ऑनलाईन बजाज सिलिंग फॅन ऑर्डर केला. त्याप्रमाणे सोमवारी (9 जून) डिलिव्हरी प्राप्त झाली. खोका बजाज कंपनीच्या फॅनचा होता. मात्र खोका उघडल्यावर फॅन ऐवजी त्यामध्ये चक्क विटांचे तीन तुकडे निघाले. त्यानंतर त्यांनी तक्रार केली. रात्री मोबाईलवर संपर्क केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. अकाउंट नंबर मागून त्यावर 2430 रुपये घेतलेली रक्कम त्याच रात्री 11.13 वाजता अकाउंटवर जमा करण्यात आली. पण या सर्व खटापटीत ग्राहक म्हणून जो मानसिक त्रास झाला याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण होतो.

'पैसे त्याच दिवशी माझ्या खात्यावर जमा झाले, पण...'

"यापुढे खरेदी करायची की नाही? हा माझ्याकडे प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहक म्हणून ऑनलाईन खरेदी करताना यापुढे सर्वांनी सावधगिरी बाळगावी. माझी फसवणूक झाली. पैसे त्याच दिवशी माझ्या खात्यावर जमा झाले, पण ऑनलाईन तक्रार नोंदवणे, अपडेट घेणे यामध्ये वेळ वाया जातो. मानसिक त्रास होतो. मी कंपनी प्रतिनिधी यांना फोन करून यापुढे कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी या संदर्भात सूचना केलेली आहे", अशी प्रतिक्रिया पदवीधर आदर्श शिक्षक जनार्दन भिलारे यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XsFMC3G

No comments:

Post a Comment