वृत्तसंस्था, दुबई: इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणचे युरेनियम समृद्धीकरण केंद्र असलेल्या नतान्झ येथील प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वांत प्रबळ निमलष्करी दल असलेल्या इराणी रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी आणि इराणी लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ जनरल महंमद बघेरी मारले गेले. याखेरीज इराणच्या विकसनाची धुरा सांभाळणारे जनरल आमीर अली हाजिदेह मारले गेले. काही अणुशास्त्रज्ञही मारले गेल्याचे वृत्त आहे. ‘इस्रायलला या हल्ल्याची जबर किंमत मोजावी लागेल. प्रतिहल्ल्याला कुठलेच बंधन नसेल,’ असा इशारा इराणचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी दिला आहे. इराणनेही प्रत्युत्तरादाखल १०० ड्रोन डागली.या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची भीती आहे. या प्रदेशातील बहुतांश देशांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला असून, दोन्ही देशांनी तातडीने परिस्थिती निवळण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. या हल्ल्यांबाबत म्हटले आहे, की आम्ही इराणमधील सुमारे १०० लक्ष्यांवर हल्ला केला. २०० विमानांनी या हल्ल्यात भाग घेतला. ‘मोसाद’च्या हेरांनी आधीच इराणमध्ये आत्मघातकी ड्रोन पाठवून ती तैनात करून ठेवली होती. तेहरानजवळील क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळांवर योग्य वेळी ती डागण्यात आली. फरदोह आणि इसफाहान या अणुप्रकल्पांनाही लक्ष्य केले. याशिवाय शिया पंथीयांचे धर्मस्थळ असलेल्या कोम शहरावरही ड्रोनने हल्ले केले. हवाई हल्ल्याच्या वेळी ही शस्त्रास्त्रेही इराणची यंत्रणेवर डागली गेली.या हल्ल्यांबाबत इस्रायली लष्कराने म्हटले आहे, की आम्ही इराणमधील सुमारे १०० लक्ष्यांवर हल्ला केला. २०० विमानांनी या हल्ल्यात भाग घेतला. ‘मोसाद’ या गुप्तहेर यंत्रणेच्या हस्तकांनी आधीच इराणमध्ये आत्मघातकी ड्रोन पाठवून ती तैनात करून ठेवली होती. राजधानी तेहरानजवळील क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळांवर योग्य वेळी ती डागण्यात आली. इस्रायलने छुप्या मार्गाने अचूक लक्ष्यभेदी शस्त्रास्त्रेही इराणच्या मध्यवर्ती भागापर्यंत नेण्यात यश मिळवले. हवाई हल्ल्याच्या वेळी ही शस्त्रास्त्रेही इराणची हवाई संरक्षण यंत्रणेवर डागली गेली. ही माहिती इस्रायली लष्करातील अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर दिली असून, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. इराणच्या युरेनियम समृद्धीकरण मोहिमेतील सर्वांत प्रमुख केंद्र असलेल्या नतान्झसह अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. या ठिकाणावरून काळा धूर येताना दिसत होता. आम्ही इराणची अनेक रडार आणि पश्चिम भागातील जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे तळही उद्ध्वस्त केले, असाही दावा इस्रायलने केला. तिन्ही वरिष्ठ अधिकारी मारले गेल्याचे इराणने मान्य केले आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायलवर १०० ड्रोन डागले. मात्र, इराक आणि जॉर्डन यांनी आपल्या हवाई हद्दीतून जात असल्याने ते पाडले.अमेरिकेची भूमिका संदिग्धया हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने इराणने अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू कराव्यात; अन्यथा भविष्यात यापेक्षाही भयंकर घडेल, असा इशारा दिला. दुसरीकडे, यांनी निवेदन प्रसिद्ध करून इराणवरील हल्ल्यांशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेने संदिग्ध भूमिका घेतल्याचे दिसून आले. इस्रायल हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकेने आधीच दिला होता, असा दावाही अमेरिकेने केला. कोण मारले गेले ?जनरल महंमद बघेरी : इराणी रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुखजनरल हुसेन सलामी : चीफ ऑफ आर्मी स्टाफजनरल आमीर अली हाजिदेह : बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे प्रमुखपरदेशात जाणाऱ्या विमानसेवांवर परिणाम मुंबई : इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्या विमानसेवांवर परिणाम झाला आहे. इराणची हवाई हद्द विमानांसाठी बंद झाल्याने भारतातून परदेशात जाणारी काही विमाने दुसरीकडे वळवण्यात आली, तर काही विमाने शुक्रवारी माघारी वळवण्यात आली.इराणपासून आमच्या अस्तित्वालाच आहे. तो समूळ नष्ट करण्यासाठी कदाचित वर्ष लागेल किंवा काही महिन्यांतही ते काम होईल. मात्र, हा धोका आम्ही नष्ट करूच. -बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलचे पंतप्रधान आमच्या प्रिय देशाविरोधातील गुन्ह्यामागे इस्रायलचा क्रूर आणि रक्ताने बरबटलेले हात आहे. निवासी भागांना लक्ष्य करून त्यांनी त्यांचा कुटिल हेतू दाखवून दिला आहे. अयातुल्ला खामेनी, सर्वोच्च धर्मगुरू, इराण
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0BmdXuG
No comments:
Post a Comment