नाशिक : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज आषाढी वारीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता आणखी एका नेत्याचं औरंगजेबबद्दल वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे. मालेगावचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आसिफ शेख यांनी औरंगजेबाची स्तुती करणारं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. औरंगजेब एक पवित्र असून राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जातं, असं वक्तव्य आसिफ शेख यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
आसिफ शेख नेमकं काय म्हणाले?
"औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती होते. औरंगजेब यांनी नेहमी हलाल स्वत:ची टोपी शिवून त्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी कमाई केली. औरंगजेब सर्व धर्म आणि समाजाचा आदर करायचे. फक्त राजकारणासाठी त्यांना बदनाम करायचं आणि त्यांच्या नावाने मतं घेण्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरु करण्यात आलं आहे", असं वक्तव्य आसिफ शेख यांनी केलं आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अबू आझमी यांनीदेखील औरंगजेबबद्दल वादग्रस्तवक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यातील वातावरण तापलं होतं. या प्रकरणी मोठा वाद उफाळल्यानंतर आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं होतं. आपल्या वक्तव्याला मोडून तोडून दाखवण्यात आलं. त्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिलं होतं. यानंतर आता काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाचं कौतुक केलं आहे.अबू आझमी काय म्हणाले होते?
"मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. औरंगजेबाच्या काळात भारताच्या सीमा या अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी सोने की चिडिया म्हटलं जायचं. असे असताना चुकीचं म्हणू का?", असं म्हणाले होते. "छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर लढाई ही राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही", असंही वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XmJAw49
No comments:
Post a Comment