Breaking

Monday, June 23, 2025

भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचे निधन, ८९८ बळी मिळवत रचला होतो मोठा विक्रम https://ift.tt/oGkCdbL

संजय घारपुरे : भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे सोमवारी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. दोशी यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले असल्याच्या वृत्तास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव निरंजन शहा यांनी दुजोरा दिला. बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर यांच्या निवृत्तीनंतर दोशी यांनी भारताच्या फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. बेदी भारतीय संघात असल्यामुळे इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये प्रभावी ठरल्यानंतरही त्यांना संधी मिळत नव्हती. ते १९७९-८०मध्ये पहिली कसोटी खेळले, त्या वेळी ते ३२ वर्षांचे होते. कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली दोशी यांची कामगिरी बहरली. त्यांनी केवळ २८ कसोटींत शंभर बळींचा टप्पा गाठला होता. पाकिस्तानातील दौऱ्यात यश न मिळाल्यामुळे ते संघाबाहेर गेले. त्यांनी ३३ कसोटींत ११४ फलंदाज बाद केले; तसेच १५ वन-डेमध्ये २२ फलंदाजांना बाद केले होते. त्याच वेळी त्यांनी २३८ प्रथम श्रेणी सामन्यांत ८९८ फलंदाजांना टिपले होते.भारतीय संघात एकेकाळी बेदी, प्रसन्ना आणि चंद्रशेखर हे त्रिकूट होते. या त्रिकुटीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट चांगलेच गाजवले. त्यामुळे त्यांना संघाबाहेर काढण्याचे धाडस कोणामध्येच नव्हते. पण त्याचवेळी भारतामधील रणजी क्रिकेट स्पर्धेत दोशी हे एकामागून एक विकेट्स मिळवत होते. पण या त्रिकुटामुळे त्यांना संघात स्थान मिळणे कठीण होते. त्यामुळे वयाच्या ३२ व्या वर्षी ते भारतासाठी पहिला सामना खेळले. बेदी, प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्याचा प्रमाणिक प्रयत्न दिलीप दोशी यांनी केला.कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळताना दिलीप दोशी यांना न्याय मिळाला, असे म्हटले जात होते. कारण दिलीप दोशी यांना कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळताना चांगली संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. पण पाकिस्तानच्या दौऱ्यात आपली कामगिरी चांगली होऊ शकली नाही, याचे त्यांना वाईटही वाटले. त्यामुळे त्यांना भारताच्या संघाबाहेर करण्यात आले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Psf3dXh

No comments:

Post a Comment