Breaking

Friday, June 27, 2025

खामेनींना ठार करायचे होते, पण...; इस्रायली संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान https://ift.tt/YUJqvpR

वृत्तसंस्था, तेल अवीव/दुबई: इराणशी झालेल्या १२ दिवसांच्या संघर्षादरम्यान त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना ठार करायचे होते. परंतु ते हाती लागले नाहीत, गायब झाले, अशी कबुली इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी दिली आहे.इस्रायलच्या ‘चॅनेल १३’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कात्झ यांनी खामेनींची हत्या करण्याच्या इरादा होता, असे सांगितले. ‘संपूर्ण १२ दिवसांत आम्ही खामेनींचा कसून शोध घेतला. परंतु ते कुठेतरी खोल गुहेत गायब झाले. त्यांनी त्यांच्या कमांडरशी असलेला संपर्कही तोडला होता. खामेनी आमच्या दृष्टिपथास आले असते तर आम्ही नक्कीच त्यांचा खात्मा केला असता’, असे कात्झ म्हणाले. ‘खामेनींना ठार मारण्यासाठी अमेरिकेची परवानगी घेतली होती का’, यावर ‘अशा गोष्टींसीठी आम्हाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही’, असे कात्झ म्हणाले. ‘ यांची तुलना कात्झ यांनी हेजबोल्लाचा नेता हसन नसरल्ला याच्याशी केली. त्याला इस्रायलने गेल्या वर्षी टिपला. खामेनी यांनी अज्ञातवासातच रहावे. त्यांनी नसरल्लापासून काहीतरी शिकावे’, असा इशारा कात्झ यांनी दिला. अमेरिकेशी चर्चा जरा अवघडच : अराघचीआमच्या तीन अणुप्रकल्पांवर अमेरिकेने जोरदार हल्ले केले. त्यात त्यांचे बरेच नुकसान झाले आहे. अशा स्थितीत अमेरिकेशी लगेचच अणुऊर्जेसंदर्भात चर्चा होणे जरा अवघडच आहे, असे यांनी स्पष्ट केले आहे. यांच्या संघर्षात इस्रायलच्या बाजूने उडी घेत अमेरिकेने गेल्या आठवड्यात इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर हवाई हल्ले केले. त्यात फोर्दो या अणुप्रकल्पाचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. या सर्व पार्श्वभूमीवर अराघची यांनी सरकारी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना इतक्यात अमेरिकेशी चर्चा होणे शक्य नसल्याचे सांगितले. ‘अणुऊर्जेसंदर्भात चर्चा करण्यासाठी कोणतीही नवी तारीख ठरलेली नाही, कोणतीही निश्चित वेळ ठरलेली नाही आणि कोणताही करार झालेला नाही. अमेरिकेने आमच्या अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांमुळे चर्चेसाठी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे’, असे अराघची म्हणाले. दरम्यान, शुक्रवारच्या प्रार्थनेत इराणमधील अनेक धर्मगुरूंनी अयातुल्ला खामेनी यांनी दिलेल्या संदेशावर भर दिला. इराणचे उपमुख्य न्यायाधीश हमझा खलिली यांनी ज्या लोकांनी देशाशी गद्दारी केली त्यांना विशेष पद्धतीने शिक्षा केली जाईल, असे सांगितले. 'इराण-इस्रायलमध्ये शांतता आवश्यक'वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पश्चिम आशियातील घडामोडींबाबत गुरुवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. इराण अण्वस्त्रे विकसित करू शकत नाही किंवा बाळगू शकत नाही, असे रुबिओ यांनी शरीफ यांच्याशी चर्चेदरम्यान स्पष्ट केलेले. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी याबाबत माहिती दिली. प्रादेशिक स्थैर्यासाठी इस्रायल आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केल्याचेही ब्रुस यांनी म्हटले आहे. अमेरिकेने ऑपरेशन मिडनाट हॅमर राबवून, इराणमधील फोर्दो, नतान्झ आणि इस्फाहान या तीन अणुप्रकल्पांवर हल्ले केले. या पार्श्वभूमीवर अमेरिका-पाकिस्तानमधील चर्चा झाली. इराण अण्वस्त्रे विकसित करू शकत नाही, तसेच अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिओ यांनी या चर्चेदरम्यान शरीफ सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/s60Y3nE

No comments:

Post a Comment