Breaking

Friday, June 27, 2025

धक्कादायक! शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन; 'काँटा लगा गर्ल'ने हार्ट अटॅकमुळे गमावला जीव https://ift.tt/Wv5kO8X

मुंबई: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. 27 जून रोजी रात्री या अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीचे निधन कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याची माहिती रुग्णालयातील रेसिप्शनिस्टकडून समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शेफालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिच्यासह तिचा पती पराग त्यागी आणि इतर तिघेजण उपस्थित होते. तातडीने वैद्यकीय मदत मिळूनही तिला मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टने या दुर्दैवी बातमीला दुजोरा दिला आहे.'काँटा लगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शेफालीच्या अशा अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरुन गेले आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ही बातमी पसरताच सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. अद्याप तिच्या निधनाविषयी अधिक माहिती आणि कुटुंबाकडून अधिकृत निवेदन समोर आलेले नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/59Ugsy2

No comments:

Post a Comment