Breaking

Thursday, June 26, 2025

चुकीला माफी नाही.. एक रन काढायला चुकलात तर पाच धावांचा दंड, ICC चा अजब नियम आहे तरी काय पाहा.. https://ift.tt/1dUG3ja

लंडन : भारताच्या पराभवानंतर आता आयसीसीने आपल्या नियमांत बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. पण या सर्वात एक अजब नियम समोर आला आहे. त्यानुसार जर एक रन काढायला चुकले तर त्यासाठी पाच धावांचा दंड भारावा लागू शकतो, असे समोर आले आहे. हा अजब नियम नेमका आहे तरी काय, हे आता स्पष्ट झाले आहे.क्रिकेटमध्ये धावा महत्वाच्या असतात. प्रत्येक फलंदाज धावा करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो. पण आता फलंदाजांना रन काढायला चुकलाच तर त्यासाठी त्यांना पाच धावांचा दंड भारावा लागू शकतो, असा नियम आयसीसीने बनवला आहे. सुरुवातीला हा नियम पाहता, अजब वाटत असला तरी त्याचा पूर्ण विचार केल्यावर हा नियम समजून घेता येऊ शकतो.प्रत्येक फलंदाज धावा काढण्यासाठी आसूसलेला असतो. पण काही वेळा फलंदाजांकडून चुका होतात. काही वेळेला स्ट्राइकवर कोणता फलंदाज असायला हवा, यासाठी या काही गोष्टी केल्या जातात. यापूर्वी क्रिकेटच्या नियमांमध्ये त्रुटी होत्या, पण आता या नवीन नियमानुसार चुकीला माफी नसणार आहे. कारण आता जर एखादा खेळाडू धावा काढायचा चुकला म्हणजे त्याने शॉर्ट रन घेतली आणि ती जर चूक पंचांच्या लक्षात आली फलंदाजी करणाऱ्या संघावर कारवाई होणार आहे. या एका धावेच्या चुकीसाठी आता फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे एका फलंदाजाच्या मोठ्या चुकीचा संघाला मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट या खेळासाठी खेळभावना महत्वाची आहे. त्यासाठी हा नवीन नियम बनवण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही खेळाडूने खोटारडेपणा करून खेळाला बट्टा लागेल, असे काहीही करु नये. त्यामुळे आयसीसीचा हा नवीन नियम बनवण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.आयसीसीने आता जे क्रिकेटमध्ये बदल केले आहेत, ते खेळ आणि खेळाडूंचा विचार करून करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वेळेला हे नियम अजब वाटत असले तरी ते विचारपूर्वक करण्यात आले असल्याचे आता समोर येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wMrlYvT

No comments:

Post a Comment