मुंबई: अभिनेत्री सध्या तिच्या बॅक टू बॅक प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. तिचा 'मेट्रो... इन दिनो' हा मल्टीस्टारर सिनेमा 4 जुलै रोजी रीलिज होणार असून, या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. याशिवाय तिच्या आर. माधवनसोबतच्या 'आप जैसा कोई' चित्रपटाचा ट्रेलरही लॉन्च झाला. हा सिनेमा 11 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रीलिज होणार आहे. यादरम्यान तिच्या अफेअरची चर्चाही रंगली आहे. तिचे नाव अभिनेता विजय वर्मासोबत जोडले गेले आणि अलिकडेच बोलताना तिने या अफवांचे खंडन केले. फातिमाने ती सिंगल असल्याचे स्पष्ट केले.फातिमा आणि विजयच्या अफेअरच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. विजयचे अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर या अफवांना आणखी हवा मिळाली. '' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात फातिमाने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.अभिनेत्रीचा 'आप जैसा कोई' हा सिनेमा एकमेकांना सन्मानाने वागवणाऱ्या जोडप्याच्या नात्याविषयी आहे. यशस्वी नात्याबद्दल बोलताना तिने असे म्हटले की, 'ज्या नात्यात दोन व्यक्ती एकमेकांचा आदर करतात, एकमेकांचे विचार आणि मतं ऐकतात. दोघांनीही समान तडजोड करावी लागते. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे नात्यात असता, तेव्हा तुम्ही स्वतःला न गमावता नात्यासाठी प्रयत्न करता. मला वाटतं, यशस्वी नात्यासाठी हाच एक मार्ग आहे.' तिच्या आयुष्यात अशाप्रकारच्या कोणत्या जोडीदाराची एन्ट्री झाली आहे का, असे विचारले असता अभिनेत्रीने मजेशीर उत्तर दिले. तिने असे म्हटले की, 'कुठे चांगली मुलंच नाही आहेत, माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे. चित्रपटांमध्ये चांगली मुलं असतात.'फातिमाच्या आगामी बोलायचं झाल्यास तिच्या 'मेट्रो... इन दिनो' मध्ये तगडी स्टारकास्ट आहे. तिच्यासह या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता आणि अनुपम खेर असे बडे स्टार्स झळकणार आहेत. तर 'आप जैसा कोई'मध्ये ती आर. माधवनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अभिनेत्री 'गुस्ताख इश्क' या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून, यामध्ये ती विजय वर्मासोबत झळकणार आहे.फातिमाने 'दंगल' चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आणि त्यानंतर तिने लक्ष वेधून घेणाऱ्या असंख्य भूमिका केल्या. ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांसोबत जोडलेली असते. तिच्या लेटेस्ट प्रोजेक्टसंदर्भात चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sI359oU
No comments:
Post a Comment