Breaking

Thursday, June 26, 2025

Rinku Singh ला UP सरकार शिक्षण अधिकारी बनवणार, पण त्याचं शिक्षण ऐकाल तर हैराण व्हाल https://ift.tt/XACkGUJ

नवी दिल्ली : रिंकू सिंहला आता उत्तर प्रदेशच्या सरकारने नोकरी देणार असल्याचे आता समोर आले आहे. रिंकू सिंगला शिक्षण अधिकारी बनवण्यात येणार आहे. पण शिक्षण संचालक बनणाऱ्या रिंकू सिंहचं शिक्षण जर तुम्ही ऐकाल तर तुम्हीदेखील हैराण व्हाल.रिंकू सिंग हा आयपीएलमध्ये केकेआरच्या संघाकडून खेळला आणि अखेरच्या षटकात षटकारांची बरसात करून प्रसिद्ध झाला. त्यानंतर रिंकूने मैदान गाजवलं. प्रसिद्धी तर त्याला मिळालीच, पण त्याचबरोबर त्याला भारतीय संघात स्थानही मिळालं. रिंकू सिंग प्रसिद्धीच्या झोतात आला. रिंकू सिंगचं लग्नही ठरलं. त्यानंतर आता रिंकू सिंगला उत्तर प्रदेशच्या सरकारने नोकरी दिली आहे. पण ही सरकारी नोकरी त्याला क्रीडा विभागात दिलेली नाही तर शिक्षण खात्यात दिलेली आहे. पण त्यानंतर आता त्याचं शिक्षण नेमकं किती झालं आहे, हे प्रकाशझोतात आलं आहे.रिंकू सिंहला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. रिंकू धडाकेबाज फटकेबाजी करायचा आणि सर्वांची मनं जिंकायचा. रिंकू त्याचबरोबर शाळेतही जात होता. पण त्याला शाळेत जाण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानाची ओढ जास्त होती. त्यामुळे रिंकू सिंग क्रिकेटच्या मैदानात जास्त रमायचा. त्यामुळे रिंकू सिंग आठवीपर्यंत तर शिकला आणि नववीमध्ये पोहोचला. पण त्यावेळी त्याचं मन शाळेत लागत नव्हत. त्याला मैदान खुणावत होतं. त्यामुळे रिंकू सिंहने नववीमध्ये शिकत असताना शाळाच सोडून दिली आणि पूर्णवेळ तो क्रिकेटकडे वळला. त्यामुळे रिंकू सिंहचं शिक्षण हे आठवी पास असं आहे. पण आता त्याला शिक्षण अधिकाऱ्याची नोकरी मिळाली आहे. पण आता रिंकू सिंह सरकारी कार्यालयात बसणार की क्रिकेट खेळत राहणार, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.रिंकू सिंहला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे याबाबत काही पुर्तता अजून बाकी असतील. त्यामुळे रिंकूला नेमकं काय करायचं, हे अद्याप समजलेलं नसेल. पण एखाद्या खेळाडूला सरकारी नोकरी मिळणं, हे चांगलं लक्षण समजलं जात आहे. पण रिंकू आता या नोकरीला किंवा पदाला किती न्याय देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zLblDIR

No comments:

Post a Comment