Breaking

Saturday, June 7, 2025

RCB ची चिंता वाढली, बंदीची टांगती तलवार अन् BCCI ने गंभीर वक्तव्य करत अजूनच टेंशन वाढवलं... https://ift.tt/hHNOI4S

मुंबई : आरसीबीच्या संघावर आता बंदीची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे. कारण बेंगळुरुतील चेंगराचेंगरी प्रकरणानंतर आरसीबीच्या संघातील महत्वाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर ही गोष्ट आता बीसीसीआयने गंभीरपणे घेतली आहे. बीसीसीआयच्या सचिवांनी आता असं एक वक्तव्य केलं आहे की, त्यामुळे आता आरसीबीची चिंता नक्कीच वाढलेली असेल.

आरसीबीमधून कोणाला केली अटक...

बंगळुरूतील चेंगराचेंगरीनंतर आता आरसीबीमधील निखिल सोसलेला अटक करण्यात आली आहे. निखिल सोसले हा विराट कोहलीचा जवळचा मित्र होता. आरसीबीचा सामना सुरु असताना तो अनुष्का शर्माबरोबर प्रयव्हेट बॉक्समध्ये बसलेला असायचा. निखिल सोसलेकडे आरसीबीच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगची जबाबदारी होती. त्याचबरोबर निखिल हा आरसीबीचा रेव्हेन्यू हेड होता. निखिलशिवाय आरसीबीचा कोणताही महत्वाचा निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे निखिलची अटक झाल्यानंतर आता आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.

आरसीबीवर बंदीची कारवाई कशी होऊ शकते, पाहा नियम...

आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझी ही बीसीसीआयशी करारबद्ध असते. आयपीएलच्या फ्रँचायझीसाठी बीसीसीआयने काही नियम बनवले आहेत. या करारात सार्वजनिक सुरक्षेबाबत एक महत्वाचे कलम आहे. आता बेंगळुरुत जी चेंगराचेंगरी झाली त्यासाठी पोलिसांनी आरसीबीला दोषी ठरवले आहे. कारण आरसीबीविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता या प्रकरणी चौकशी समिती नेमली गेली आहे. या चौकशी समितीने जर आरसीबीला दोषी ठरवले तर त्यांच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते.

बीसीसीआयने काय म्हटले आहे, पाहा..

बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी म्हटले आहे की, " बीसीसीआयला काही ठिकाणी कारवाई करावी लागेल. कारण आम्ही शांत बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. ही विक्टरी परेड आरसीबीची होणार होती, त्यामुळे ही त्यांची वैयक्तिक गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे. पण भारतामध्ये जर क्रिकेटबाबत कोणतीही मोठी गोष्ट घडते तर त्यासाठी बीसीसीआय जबाबदार ठरते. कारण बीसीसीआय हे भारतामधील क्रिकेट पाहणारी सर्वोच्च संघटना आहे. यासारख्या दुर्घटनी भविष्यात होऊ नयेत, अशी आम्ही आशा करतो. आमच्यासाठी चाहते आणि त्यांचे जीव महत्वाचे आहेत. आमच्या मते लोकांच्या आयुष्यापेक्षा मोठं काहीच नाही. "बेंगळुरूतील चेंगराचेंगरीनंतर आता आरसीबीला दोषी ठरवलं जात आहे. कारण त्यांनी ऐनवेळी कार्यक्रम करायचं ठरवलं आणि हा सर्व गोंधळ झाला. त्यामुळे आता आरसीबीवर बंदी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bw9XVzq

No comments:

Post a Comment