Breaking

Saturday, June 7, 2025

नोव्हाक जोकोव्हिच निवृत्त होणार... फ्रेंच ओपनमधील पराभवानंतर दिले संकेत, काय म्हणाला पाहा.. https://ift.tt/zGd3Mih

संजय घारपुरे : ‘नोव्हाक जोकोविचला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शुक्रवारी रात्री हार पत्करावी लागली. ही कदाचित माझी फ्रेंच ओपन स्पर्धेतील अखेरची लढत असू शकते. नेमके सांगता येणार नाही,’ असे वक्तव्य जोकोविचने केले.जोकोविचने २४ ग्रँड स्लॅम विजेतीपदे जिंकली आहेत. तो लवकरच ३९ वर्षांचा होईल. त्याला अव्वल मानांकित यानिक सिनरविरुद्ध ४-६, ५-७, ६-७ (३-७) अशी हार पत्करावी लागली. पराभवानंतर कोर्ट सोडण्यापूर्वी जोकोविचने आपली टेनिस बॅग खाली ठेवून चाहत्यांकडे बघत हात जोडले आणि त्यानंतर त्यांच्याकडे बघत टाळ्या वाजवल्या. त्यापूर्वी सामना संपल्यानंतर त्याने आपल्या एका हाताचे चुंबन घेतले होते आणि तोच हात कोर्टवर ठेवला होता. जणू आपण कोर्टचा निरोप घेत असल्याचे त्याने सूचित केले होते.‘ही माझी या कोर्टवरील ही अखेरची लढत असू शकते. नेमके सांगता येणार नाही; पण तरीही मनात भावनांचा खूपच कल्लोळ झाला आहे. ही ‘रोलँ गॅरो’वरील खरोखरच माझी अखेरची लढत आहे का, नेमके सांगू शकणार नाही; मात्र हा खरोखरच येथील अखेरचा सामना असेल तर चाहत्यांचा मी खूपच ऋणी आहे. या लढतीच्या वेळी वातावरण खूपच चांगले होते,’ असे तो म्हणाला.‘माझी अजूनही खेळण्याची इच्छा नक्कीच आहे; पण बारा महिन्यानंतर पुन्हा या कोर्टवर असणार का हे सांगणे अवघड आहे. ही माझी अखेरची लढत असू शकते असे मी म्हणालो. ही माझी अखेरची लढत आहे, असे मी कधीही सांगितलेले नाही,’ असे त्याने स्पष्ट केले.‘मी या वर्षीची विम्बल्डन आणि त्यापाठोपाठ अमेरिकन ओपन नक्कीच खेळणार; पण त्यानंतर काय... उद्या माझ्या जीवनात काय घडणार हे मी आताच कसे सांगणार. आगामी लढतीसाठी पूर्वीप्रमाणेच तयारी तर मी सुरू करणार,’ असे त्याने सांगितले.जोकोविचने २०२३च्या अमेरिकन ओपननंतर एकही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही. ‘विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याची मला सर्वाधिक संधी आहे. कदाचित जास्त वेगवान असणाऱ्या हार्ड कोर्टवर हे घडू शकते,’ अशी आशा त्याने व्यक्त केली; मात्र त्याला २०२२ पासून विम्बल्डन विजेतेपदाने गुंगारा दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wUdKhZp

No comments:

Post a Comment