म.टा.प्रतिनिधी, बुलढाणा: दडी मारून बसलेल्या पावसाने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दमदार पुनरागमन केले. चार-पाच तास पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेल्याने झाले आहे. काही गावांतील घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. अकोला जिल्ह्यात नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा तर बुलढाणा जिल्ह्यात सर्पदंश झाल्यानंतर पुरामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला.बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यात मंगळवारी पहाटे चार तास बरसलेल्या दमदार पावसामुळे झाली आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने हजारो हेक्टरमधील उभी पिके पाण्याखाली गेली. देऊळगाव कुंडपाळ, अजिसपूर, धाड, पांग्रा डोळे, टिटवी, लोणार, हिरडव, बोरखेडी, गुंधा या भागात पिकांचे नुकसान झाले. देऊळगाव कुंडपाळजवळील तलावास मोठे भगदाड पडले असून, तो फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. काही नद्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चार मार्गांवरील गावांचा संपर्क तुटला होता. हिरडव ते लोणार, लोणार ते देऊळगाव कुंडपाळ, अजिसपूर ते खुरमपूर, वडगाव ते वडगाव फाटा या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. टिटवी, देऊळगाव कुंडपाळ व गुंधा लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले असून सांडव्याद्वारे विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या देऊळगाव कुंडपाळ, टिटवी, रायगाव, नांद्रा, गुंजखेड, मोहोतखेड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ‘लोणार तालुक्यातील पाच व खामगाव, शेगाव तालुक्यातील दोन मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पिके, शेतजमिनी आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा’, असे निर्देश यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटकाधाड येथील पुरात अडकल्याने जीव वाचविण्यासाठी शेतातील टीनशेडवर जावून बसले. त्यांना वाचविण्यासाठी मुलगा गेला आणि तोसुद्धा तिथेच अडकला. याबाबतची माहिती मिळताच शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांना तहसीलदार व पोलिसांना माहिती दिली. अखेर बचाव पथकाने विठ्ठल रामचंद्र वाघमारे व विकास विठ्ठल वाघमारे या पिता-पुत्रास सुखरूप बाहेर काढले. लोणार येथील शेख महेबुब शेख रऊफ यांच्या घराशेजारील भिंत पडल्याने त्याखाली दबून दुचाकीचे नुकसान झाले. पैनगंगा, अडाण, काटेपूर्णाला पूरवाशीम जिल्ह्यातील पैनगंगा, अडाण आणि काटेपूर्णा नदीला आलेल्या पुराने पिके वाहून गेली. दुबार आणि तिबार पेरणी केलेले पीकही पुरात वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने काठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे शेलू खडसे, वाकद, पिंपळगाव, अकोली, हिवरा या गावांतील शेती पाण्याखाली गेली आहे. मालेगाव तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने कुत्तरडोह, अमानवाडी, रामराववाडी, पिंपळखेडा या गावांचा संपर्क तुटला होता. कुत्तरडोह गावाजवळच्या पुलाची उंची कमी असल्याने पुढील तीन ते चार दिवस पुलावरून पाणी वाहणार असल्याचे गावकरी सांगत आहे. शेलुबाजार परिसरातील अडाण नदीला पूर आल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.अनेक ठिकाणी शेतातील मातीसह पिके वाहून गेलीत. पिंपरी, खरबी, मसोला, गणेशपूर या भागातील शेतीला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात आज, बुधवारीही पावसाचा जोर कायम राहणार असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.लोणार सरोवराची पाणी पातळी वाढलीलोणार शहरात दमदार पाऊस झाल्याने काठावरून सरोवरात पाणी गेले. आधीच सरोवरातील पाण्याची पातळी वाढलेली होती. आजच्या पावसाने त्यात भर पडून चार ते पाच फूट पाणी पातळीत वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरोवरामधील कमळजा माता मंदिर चौथऱ्यापर्यंत पाण्याखाली गेले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ondvjq6
No comments:
Post a Comment