बँकॉक: एका 35 वर्षांच्या महिलेने थायलंडच्या धार्मिक भावनांना हादरवून सोडलं आहे. तिथे थायलंडमध्ये सर्वात मोठा घोटाळा केला आहे. संपूर्ण देशाच्या श्रद्धेला धक्का देणारा हा घोटाळा आहे. तिने प्रथम बौद्ध भिख्खूंना वासनेच्या जाळ्यात अडकवले आणि त्यांनंतर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले गेले. याच व्हिडिओच्या माध्यमातून तिने ब्लॅकमेलिंगची ही मालिका सुरू केली. या महिलेने फक्त 9 बौद्ध भिख्खूंकडून 100 कोटींहून अधिक रुपयांची खंडणी वसूल केली.या महिलेला आता थाई पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी तिचे नाव - मिस गोल्फ असे ठेवले आहे. या महिलेच्या कारनाम्यांनी संपूर्ण देश हादरून गेला आहे. पोलिसांनी या महिलेच्या घरातून 80,000 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो जप्त केले आहेत. या आधारे, बौद्ध भिख्खूंना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जात होते, असं समोर आलं आहे. आतापर्यंत पोलिसांना असे किमान 9 भिख्खू सापडले आहेत, जे मिस गोल्फच्या जाळ्यात अडकले होते. ही संख्या अधिक असू शकते, असंही पोलिसांनी सांगितलं.मिस गोल्फ हे काम गेल्या बऱ्याच काळापासून करत होती. बौद्ध भिख्खूंनी ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक असते. याचा फायदा घेत मिस गोल्फ भिख्खूंना तिच्या जाळ्यात अडकवत राहिली. जर पोलिसांना या प्रकरणाचा सुगावा लागला नसता तर हे सर्व असंच सुरु राहिले असतं आणि कधीही ही घटना समोर आली नसी.
घटना उघड कशी झाली?
गेल्या महिन्यात जूनमध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, बँकॉकमधील एका भिख्खूने अचानक भिख्खूचे जीवन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना कळले की हा ब्लॅकमेलिंगचा कट आहे, ज्यामुळे या भिख्खूने अचानकपणे हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मिस गोल्फ ही भिख्खूंना ब्लॅकमेल करत होती. गेल्या वर्षी मे महिन्यात मिस गोल्फचे या भिख्खूशी संबंध जुळले आणि नंतर तिने दावा केला की ती आई होणार आहे. तिने मुलाच्या संगोपनासाठी 70 लाख थाई बाहत म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 18.52 कोटी रुपये मागितले.पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की एका भिख्खूने आपले भिख्खूचे जीवन सोडल्याचे प्रकरण एवढा मोठा घोटाळा उघड करेल. जेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा पोलीसही चकित झाले. कारण, फक्त एक नाही तर अनेक भिख्खू या मिस गोल्फच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत होते.मिस गोल्फ आधी संबंध ठेवायची आणि नंतर ब्लॅकमेल करायची. हा संपूर्ण घोटाळा 385 दशलक्ष बाहत म्हणजेच 100 कोटी रुपयांहून अधिकचा आहे आणि हे सर्व गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. हे पाहून पोलीसही चक्रावून गेले.बौद्ध भिख्खूंना अडकवायचं आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं, हेच मिस गोल्फचं काम होतं. पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा टाकला तेव्हा 80,000 हून अधिक व्हिडिओ आणि छायाचित्रे जप्त करण्यात आली, ज्यात या कटाची संपूर्ण कहाणी होती.थायलंडमध्ये श्रद्धेला मोठा धक्का
थायलंडमध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे. या देशातील 90 टक्क्यांहून अधिक लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. या घोटाळ्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. देशातील बौद्ध संस्थांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, त्या भिख्खूंना कठोर शिक्षा देण्याचीही मागणी केली जात आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ed5vNQU
No comments:
Post a Comment