Breaking

Saturday, July 19, 2025

जीवंतपणी अबोला, वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही अनुपस्थिती, कबरीजवळ जाऊन सांगितलं- मला हिच मुलगी आवडते... https://ift.tt/trxp5wS

मुंबई- बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयातून आपली छाप पाडली आहे. अनेकांनी हालाखीची परिस्थिती पार करुन हे स्थान मिळवले. इंडस्ट्रीत असाच एक कलाकार आहे त्याला आता दिग्गज म्हणून ओळखले जाते. या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला.... हा अभिनेता म्हणजे आजच्या काळात ते एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा 75 वा वाढदिवस आहे. त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपली पात्रे अतिशय सुंदरपणे साकारली आहेत. यांची संवाद बोलण्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे. पडद्यावर स्पष्टवक्ते दिसणारे नसीरुद्दीन खऱ्या जीवनातही त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखले जातात. काही काळापूर्वी, या ज्येष्ठ अभिनेत्याने त्यांच्या वडिलांसोबतच्या कटू नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. 20 जुलै 1950 रोजी बाराबंकी येथे जन्मलेले नसीरुद्दीन शाह यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांचे वडिलांशी असलेले नाते नेहमीच गोंधळलेले राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार ते कधीही त्यांच्या वडिलांना समजू शकले नाहीत. ते शतकानुशतके चालत आलेल्या जुन्या परंपरांसह एका वेगळ्या जगात राहत होते. नसीरुद्दीन शाह त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत नसीरुद्दीन यांनी मुलाखतीत सांगितले की, 'ते माझ्या कुटुंबाचे प्रमुख होते. याचा अर्थ असा की ते जे काही बोलतील तेच घडायचे. जरी, मी प्रयत्न केला की मी माझ्या मुलांमध्ये कधीही ती दरी येऊ देणार नाही, परंतु ते होऊ शकले नाही. ती दरी माझ्या आणि माझ्या मुलांमध्ये नेहमीच राहिली, ज्याची मी कधीही भरून काढू शकलो नाही याचा मला नेहमीच पश्चात्ताप होत असे.' हे मला स्वतः वडील झाल्यानंतर जाणवले. वडिलांबद्दल सर्वात जास्त काय आठवत होते, हे त्यांना स्वतः वडील झाल्यावरच कळले. नसीरुद्दीन यांनी खुलासा केला की जेव्हा त्यांचे वडील गेले तेव्हा ते त्यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी ते शहराबाहेर होते. विमान कर्मचाऱ्यांनाही त्यांना सांगता येत नव्हतं की त्यांना लवकरात लवकरच एके ठिकाणी पोहचण्याची गरज आहे. नंतर जेव्हा नसीर सरदाना इथे आले तेव्हा त्यांनी त्यांच्या वडीलांना कायमचे गमावले होते. वडिलांच्या कबरीला भेट देतात अभिनेते म्हणाले, 'मी त्यांच्या कबरीवर गेलो आणि त्यांना माझ्या मनात असलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. मी त्यांना त्या चित्रपटाबद्दल देखील सांगितले ज्याचे काम मी त्यावेळी पूर्ण केले होते. मी त्यांना माझ्या स्वप्नाबद्दल देखील सांगितले. मी त्यांना रत्नाबद्दल सांगितले, ज्याबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हते. माझ्या मनावर एक ओझे वाटत होते. अचानक असे वाटले की मी काहीतरी गमावले आहे. मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत आहे.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vHbhw2V

No comments:

Post a Comment