Breaking

Tuesday, July 1, 2025

'मी डोळ्यांत पाणी आणून फक्त विक्रम गोखलेंकडे पाहत राहिलो', संकर्षणने सांगितला भावूक करणारा प्रसंग https://ift.tt/8p74O61

मुंबई : आपण एखाद्या मित्राला किंवा आपल्या भावंडांना गिफ्ट म्हणून एखादं सुंदर पुस्तक देतो. तसं आपण अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याची ही मुलाखत गिफ्ट म्हणून देऊ शकतो. इतकी सुंदर ही मुलाखत आहे. या मुलाखतीत संकर्षण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील जडणघडणबाबत बोलताना दिसतो. संकर्षणला लहानपणापासून कशी माणसं भेटत गेली आणि तो त्यांच्याकडे पाहून कसा घडत गेला, याबाबत संकर्षणने खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. पण त्याने सांगितलेल्या बहुतेक आठवणी या मनाला स्पर्श करणारी आहेत. संकर्षणने आपल्या मुलाखतीत लहानपणी लेखिका सुलभा देशपांडे यांची भेट झाली तेव्हा कशी चर्चा झाली होती हे सांगितलं आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्याला दिग्गज कलाकारांनी खूप आपुलकीने आणि मायेची वागणूक दिली. आपल्या ऐन संघर्षाच्या काळात उमेद दिली. त्यामुळे आपण कलाकार म्हणून यशस्वी झाल्याचं संकर्षण सांगतो. यावेळी त्याने दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबतचा एक भावनिक प्रसंग सांगितला. नगर जिल्ह्यातील एका खेडेगावात चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. या चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासोबत मला काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. या चित्रपटाचा शेवटचा सीन शूट करायचा होता. पण विक्रम गोखले यांना संबंधित लिहिलेला सीन आवडला नव्हता. ते व्हॅनिटित जाऊन बसले. बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नाहीत म्हणून मी व्हॅनिटीत गेलो. मी त्यांना घाबरत घाबरत विचारलं, विक्रम सर तुमची हरकत नसेल तर सीन लिहू का? असं विचारलं. त्यावर त्यांनी तू सीन लिहिशील? तुला जमेल का? असं विचारलं. मग मी हो म्हटलं. त्यानंतर त्यांनी मला तिथेच बाजुला बसून सीन लिहायला सांगितलं. मी तो सीन लिहिला. त्यांनी शांतपणे तो सीन 15 ते 20 मिनिटे वाचला, अशी आठवण सांगितली."मी सीन लिहून झाल्यानंतर त्यांना वाचायला दिला. यानंतर त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शकांना फोन करून व्हॅनिटीत बोलावलं. त्यांना सांगितलं की, या मुलाने खूप उत्कृष्ट असा सीन लिहिला आहे. या मुलाचं नाव विशेष सहाय्यक लेखक म्हणून चित्रपटात टाका किंवा त्याला आता 11 हजार रूपयांचं मानधन द्या. विक्रम गोखले यांचे हे बोल एकूण माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी डोळ्यांत पाणी आणून फक्त विक्रम गोखले यांच्याकडे पाहत राहिलो", अशी भावनिक आठवण संकर्षण सांगतो. "मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजानी मला इतकी सुंदर वागणूक दिल्याने माझी कोणत्याही नवोदित कलाकारासोबत उद्धटपणे बोलण्याची हिंमतही होणार नाही", असं म्हणाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EVneoH5

No comments:

Post a Comment