नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही संघ लवकरच मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेत एकूण सहा संघ भाग घेणार आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.भारतीय टीम एक दशकाहून अधिक काळानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेलेली नाही, परंतु आयसीसी आणि अन्य बहुदेशीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान फक्त खेळत आहेत. त्यामुळे आता सहा देश असणाऱ्या या स्पर्धेत आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे.वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचा थरार १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, इंडिया चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स, पाकिस्तान चॅम्पियन्स, वेस्ट इंडिज चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स या नावाच्या एकूणसहा संघ भाग घेणार आहेत. टूर्नामेंटचा पहिला सामना १८ जुलै या दिवशी इंग्लंड आणि पाकिस्तानच्या संघांत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना २० जुलैला खेळवला जाईल. हा सामना एजबेस्टनच्या मैदानात होणार आहे.इंडिया चॅम्पियन्स टीममध्ये युवराज सिंह, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि इरफान पठाण हे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. पाकिस्तान टीममध्ये शाहिद आफ्रिदीदेखील खेळणार आहे, ज्याने ऑपरेशन सिंदूरच्या आधी आणि नंतरही भारताच्या विरोधात अनेक विवादित विधानं केली होती. शाहिद आफ्रिदीला भारत विरोधी वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते.पहलगाम हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, " दहशतवाद्यांनी जवळपास एक तास पहलगाममध्ये लोकांना मारणे सुरू ठेवले, पण 8 लाखांमधील एकही भारतीय जवान तिथे आला नाही. यानंतर भारताने पाकिस्तानला हल्ल्याचा जबाबदार ठरवले."
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये टीम इंडियाच्या सामन्यांवर एक नजर टाकूया..
भारताचा पहिला सामना 20 जुलै रोजी पाकिस्तानसोबत आहे. त्यानंतर 22 जुलै रोजी दक्षिण आफ्रिका, 26 जुलै रोजी ऑस्ट्रेलिया, 27 जुलै रोजी इंग्लंड आणि 29 जुलै रोजी वेस्ट इंडिज यांच्याशी भारताचे सामने होणार आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CUk3Vjv
No comments:
Post a Comment