वृत्तसंस्था, नवी दिल्ली: ‘काँग्रेस आघाडीच्या मुद्द्यावर शिवसेना ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच चर्चा करील. जागावाटप त्यांच्यासोबतच होईल. आता कोणासोबत उपआघाडी करायची हा निर्णय त्यांचा असेल,’ अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी स्पष्ट केली. ठाकरे बंधू; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपली भूमिका मांडली. ‘राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले आणि तो पक्ष सोबत गेला, तर महाराष्ट्रात काँग्रेसला त्यांच्यासोबत युती कायम ठेवणे अवघड होईल,’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेना ‘उबाठा’चे प्रमुख आणि मनसे प्रमुख यांचे एकत्र येणे हा ‘कौटुंबिक विषय’ असल्याचे चव्हाण म्हणाले. मात्र, ते एकत्र आल्यास पूर्वीची शिवसेनेची मते एकत्र होतील आणि त्यांना फायदा होईल, असेही ते पुढे म्हणाले. यांच्याविषयी विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. ते मोठी गर्दी खेचणारे नेते आहेत; जेव्हा जेव्हा त्यांची जाहीर सभा होते, तेव्हा प्रचंड गर्दी असते; पण त्याचे मतांमध्ये रूपांतर होत नाही आणि म्हणूनच सध्याच्या विधानसभेत त्यांचे अस्तित्व नाही.’ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे हा कौटुंबिक मुद्दा. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हासुद्धा कौटुंबिक मुद्दा आहे. कोणी कोणात विलीन व्हायचे आणि त्या पक्षाचा प्रमुख कोण असेल, हे तेच ठरवतील. ठाकरे बंधू एकत्र आल्यास पूर्वीची शिवसेनेची मते एकत्र होतील आणि त्यांना फायदा होईल, असेही ते पुढे म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CU1DSF7
No comments:
Post a Comment