मुंबई- अभिनेत्री या मराठी सिनेसृष्टीतलं मोठं नाव आहे. त्यांनी आजवरअनेक सुपरहिट सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. अभिनयाच्या प्रत्येक माध्यमांमध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा आहे. सध्या त्या कुटुंब कीर्तन या संकर्षण कऱ्हाडे सोबतच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. वंदना बरेच ठिकाणी वेगवेगळ्या मुलाखती देत असतात. अशाच एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या बाबतचा एक जुना किस्सा शेअर केला.अभिनेत्री यांनी काही वर्षांपूर्वी झुंज हे नाटक केलं होतं. हे नाटक खूप हाउसफुल झालेलं. त्यामध्ये त्यांची रखमा ही भूमिका साकारली होती. वंदना गुप्ते यांनी साकारलेली रखमा ही भूमिका नाटकाला आलेल्या एका प्रेक्षकाला इतकी आवडले की त्यांनी थेट वंदना यांना लग्नाची मागणी घातली. अमोल परचुरे यांच्या कॅचअप मराठी या चॅनलला दिलेल्या मुलाखती त्यांनी हा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, ''सोलापूर मध्ये आमचा झुंज या नाटकाचा प्रयोग संपला. मी नाटकानंतर जीन्स वगैरे घालून बसले होते. तेवढ्यात समोर तीन अँबेसिडर गाड्या येऊन थांबल्या. जेवायला जायचं म्हणून आमचे मेकअप मन कृष्णा बोरकर हे बाहेर बसले होते. गाडीतील त्या व्यक्तीने बोरकरांना विचारलं की रखमा कुठे आहे? त्यांनी आत बसल्या आहेत असं सांगितलं. मग ते माझ्याकडे आले आणि बहुदा त्यांनी मला ओळखलं नव्हतं. त्यांनी मलाच विचारलं रखमा कुठे आहे? मग मी त्यांना म्हणाली- मीच रखमा आहे... नाटकानंतर मी मेकअप उतरवला होता त्यामुळे त्यांनी मला ओळखलं नव्हतं शिवाय मी त्यांच्याशी नाटकांमधल्या टोन मध्ये न बोलता शुद्ध भाषेत बोलत होते त्यामुळे त्यांना थोडं आश्चर्य वाटलं.'''ते म्हणाले बरं...! त्यानंतर त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. ''माझा पुतण्या आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी लग्नाची मागणी घालायला आलोय! यावर मेकअप मन बोरकर लगेच म्हणाले, की अहो त्यांना 2 मुलं आहेत. यावर त्यांनी उत्तर दिलं- असू दे की... काय हरकत नाही! आपण कोर्टात अर्ज टाकू. आमच्या शेतात लई रानडुक्कर येतात खूप त्रास देतात... अशी खमकी बाई आम्हाला सून म्हणून पाहिजे.'' या नाटकात माझा आवाज एकदम खमका होता. त्यामुळे तो अचानक बदलला आता कोणी मला फोन केला तरीही मला कोणी मॅडम न बोलता सर म्हणूनच बोलतात...!'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/B7v3ct5
No comments:
Post a Comment