क्वालालंपूर : क्वालालंपुरमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व्हिसावर आलेल्या ८० परदेशी तरुणांना भीक मागताना पकडण्यात आले. पोलिसांनी केलेल्या छाप्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. या ८० जणांमध्ये तब्बल ७७ तरुण हे पाकिस्तानचे, तर ३ बांगलादेशी वंशाचे असल्याचे सांगितले जाते. सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाऱ्यांच्या वाढत्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. हे विद्यार्थी व्हिसावर आले असले तरी, ते कोणत्याही कॉलेजमध्ये शिक्षण घेत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. मलेशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ८० परदेशी विद्यार्थ्यांना भीक मागताना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी काही तरुण भीक मागत असल्याची तक्रार मिळाली होती. भीक न मिळाल्यास हे तरुण भांडण करत असल्याच्या तक्रारीही पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून या तरुणांना अटक केली.परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आश्चर्याची बाब म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या व्हिसाची तपासणी केली असता, ते शिक्षण घेण्यासाठी आले असले तरी, कोणत्याही कॉलेजमध्ये ते शिक्षण घेत नसल्याचे उघड झाले. त्यांनी भीक मागून जगण्यालाच स्वीकारले होते. या अगोदरही इतर देशांमध्येही अनेक पाकिस्तानमधील लोकांना भीक मागताना पकडले होते.मलेशिया पोलिसांनी अधिकृतपणे सांगितले की, पकडलेल्या ८० लोकांमध्ये ७७ पाकिस्तानी वंशाचे आणि ३ वंशाचे आहेत. या सर्वांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. धार्मिक व्हिसावर सौदीमध्ये गेले अन् ...यापूर्वी आखाती देशांनीही पाकिस्तानमधून लोक येऊन भीक मागण्याचे काम करत असल्याचे होते. सौदी अरबने प्रशासनाकडे तक्रार केली होती की, त्यांच्या देशात पाकिस्तानमधून येणारे बहुतेक लोक भीक मागत आहेत. हे लोक धार्मिक व्हिसावर सौदी अरबियामध्ये जातात आणि त्या आडून भीक मागण्याचे काम करत. पाकिस्तानी भिकारींमुळे त्रस्त होऊन सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा देण्यासाठी अनेक कठोर नियम लागू केले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/X2uf0HI
No comments:
Post a Comment