Breaking

Wednesday, July 16, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहिला 'सितारे जमीन पर', भेटीत आमिर खाननं बोलून दाखवली खास इच्छा https://ift.tt/p0qZFah

मुंबई : काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. देशाच्या राष्ट्रपतींनी देखील सिनेमाचं कौतुक केलं होतं. आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील आमिर खानचा हा सिनेमा पाहिला.शिवसेना प्रवक्त्या यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या निर्मित 'सितारे जमीन पर' या सिनेमाचा विशेष शो आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. या खास शोसाठी एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विशेष मुलांच्या प्रश्नांसाठी मोठे निर्णय घ्यावे लागले तर घेऊ, असा विश्वास व्यक्त केलाय.विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी, विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित '' हा सिनेमा तयार केला असून, त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळण्यात आला असल्याचं म्हटलं. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यायला हवं, अशी इच्छा अभिनेता आणि निर्माता यांनी या वेळी बोलून दाखवली. याला दुजोरा देत, विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं.अभिनेता आणि निर्माता आमिर खान यांच्यासह दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनाही हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसंच हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. दरम्यान, सितारे जमीन पर सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. आमिर खाननं त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट का म्हटलं जातं ,हे या चित्रपटातून पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे .चित्रपटाच्या दमदार कथेपासून ते सुपरस्टारच्या अभिनयापर्यंत सर्वांचंच कौतुक होताना दिसतंय. ‘चॅम्पिअन्स’ या स्पॅनिश चित्रपटावर बेतलेली ही कथा भारतीय साच्यात खुबीनं उतरवली गेलीय. त्यामुळं ती जवळची वाटते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0EyZUga

No comments:

Post a Comment