संजय घारपुरे : मॅग्नस कार्लसनचे भारतीय बुद्धिबळपटूंविरुद्धचे अपयश कायम आहे. कार्लसनला फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम मालिकेतील लास व्हेगास स्पर्धेत रमेशबाबू प्रज्ञानंदविरुद्ध हार पत्करावी लागली. या पराभवामुळे कार्लसनची स्पर्धेत पिछेहाट झाली. प्रज्ञानंद; तसेच अर्जुन एरिगेसी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत असताना कार्लसन विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला आहे.प्रागविरुद्ध कार्लसनने आक्रमक खेळ केला आणि त्याचा त्याला फटका बसला. त्याला सावरण्याची संधी मिळाली होती; मात्र त्याचा फायदा तो घेऊ शकला नाही. त्यामुळे पराभूत झाला. त्याने त्यापाठोपाठची वेस्ली सोविरुद्धची लढत भक्कम स्थिती असताना गमावली. कार्लसनने लेवॉन ॲॅरोनियनविरुद्ध दोन्ही टायब्रेकर डाव गमावले. त्यामुळे त्याच्यावर साखळीतच बाद होण्याची वेळ आली.पांढरे मोहरे असलेल्या प्रज्ञानंदने आपली स्थिती भक्कम करण्यास पसंती दिली. कार्लसन आक्रमक खेळून त्यासाठी प्रज्ञानंदलाही प्रेरित करीत होता. अकराव्या चालीत प्रज्ञानंदने प्यादे जिंकल्यावर प्याद्यांची अदलाबदल करण्याची चुक कार्लसनकडून घडली; मात्र कार्लसनने त्यानंतर स्वतःला सावरले. प्रज्ञानंदने सधी देण्यास तयार नव्हता. कार्लसनने उंटाची अदलाबदली करण्याची चूक केली. त्याचा फायदा घेत प्रागने ३९ चालींत बाजी मारली. या विजयासह प्रज्ञानंद व्हाइट गटात ४.५ गुणांसह अव्वल आला. त्याने सरस टायब्रेक गुणामुळे नॉदिरबेक अब्दुसात्तोरोव आणि जावोखिर आणि सिंदारोव यांना मागे टाकले. चार गुण मिळवलेला कार्लसन चौथा आला. त्याचे आणि लेवॉन ॲॅरोनियनचे समान गुण असल्यामुळे टायब्रेक लढत खेळवण्यात आली. त्यातील दोन्ही डाव कार्लसनने गमावले.काळ्या गटात अर्जुन एरिगेसीने हिकारू नाकामुरा आणि हॅन्स मॉक निएमन यांच्यापाठोपाठ तिसरा क्रमांक मिळवला. फॅबिआनो करुआना चौथा आणि विदीत गुजराती आठवा आला. विदीत दुय्यम गटातच्या उपांत्यपूर्व फेरीत कार्लसनला आव्हान देईल. भारताच्या खेळाडूंनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेत त्यांना अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. त्यामुळे या स्पर्धेत आता भरातीय खेळाडूंची कामगिरी कशी होते आणि ते नेमका कितवा क्रमांक पटकावतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vgkPTj
No comments:
Post a Comment