Breaking

Wednesday, July 9, 2025

ठाण्यातील शाळेत घडलं काहीसं भयंकर! मासिक पाळीच्या नावाखाली १० ते १२ वर्षांच्या मुलींना केलं विवस्त्र; गु्न्हा दाखल https://ift.tt/r9CEYPd

: ठाणे जिल्ह्यातील शहापुर येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता ५वी ते १०वीपर्यंत शिकणाऱ्या १० ते १२ विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या कारणावरून विवस्त्र करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापिका, पाच शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापन समितीतील दोन महिला अशा आठ जणींवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणात मुख्याध्यापिका व एक महिला कर्मचारी यांना अटक करण्यात आली असून, त्यांना १० जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.नेमकं काय घडलं?८ जुलै रोजी सकाळी सुमारे १० ते १२ दरम्यान ही घटना घडली. शाळेच्या हॉलमध्ये ३०० हून अधिक मुलींना एकत्र बोलावण्यात आलं. त्यानंतर शाळेच्या बाथरूममधील रक्ताचे डाग प्रोजेक्टरवर दाखवून, मासिक पाळी कोणाला आली आहे, याची विचारणा करण्यात आली. यानंतर पाळी आलेल्या मुलींचे हाताचे ठसे घेण्याचे आदेश पाच शिक्षिकांना देण्यात आले. अधिक धक्कादायक बाब म्हणजे ज्या विद्यार्थिनींना मासिक पाळी आली नव्हती, त्यांना शाळेच्या कर्मचाऱ्यांनी बाथरूममध्ये नेऊन कपडे काढायला लावून तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.पालकांचा संताप अनावरही माहिती समजताच ९ जुलै रोजी शेकडो पालकांनी शाळेत धाव घेतली आणि संबंधित मुख्याध्यापिकेसह शिक्षकांकडे जाब विचारत शाळेतील वातावरण तणावपूर्ण केलं. पालकांनी विद्यार्थिनींवर मानसिक अत्याचार झाल्याचा आरोप करत, शाळेतील गैरवर्तनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं. विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल योग्य शिक्षण देण्याऐवजी अशा अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.गुन्हा दाखल, शाळेची भूमिकाया प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात आठ महिलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्यांनी संबंधित मुख्याध्यापिकेला तात्काळ कामावरून दूर केल्याचं सांगितलं. मात्र, यापेक्षा अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ही घटना केवळ विद्यार्थिनींच्या स्वाभिमानाशी संबंधित नसून, शिक्षणसंस्थांतील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पालकांनी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hXNJIt1

No comments:

Post a Comment