Breaking

Wednesday, July 9, 2025

गुरुदक्षिणा सोडाच, रोहित शर्मा आपल्या गुरुंनाच विसरला, कार्यक्रमात साधं नावही घेत नाही... https://ift.tt/Gv09Jsy

मुंबई : आपल्याला ज्यांनी घडवलं, त्या गुरुंना वंदन करायचा, त्यांना गुरुदक्षिणा द्यायचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. पण गुरुदक्षिणा तर सोडाच, भारताचा स्टार क्रिकेटर आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा आपल्या गुरुंनाच विसरल्याचे आता समोर येत आहे.रोहित शर्मा हा गोलंदाज होता, त्याला फलंदाज बनवला तो त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी, कारण लाड सरांनीच त्याच्यातला फलंदाज घडवला. रोहितला दिनशे लाड यांनी शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण त्याच्या कुटुंबियांकडे शाळेचे शुल्क भरण्यासाठी पैसेही नव्हते. त्यावेळी दिनेश लाड यांनी रोहित शर्माला शाळेत विनंती करून फ्री शिप मिळवून दिली. जेव्हा २०११ साली रोहित शर्माला भारताच्या वर्ल्ड कप संघामधून वगळण्यात आलं होतं. त्यावेळी रोहित शर्मा हा दिनेश लाड सरांकडेच सल्ला मागण्यासाठी गेला होता. दिनेश लाड यांनी रोहित शर्माला त्यावेळी एक सल्ला दिला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला, चॅम्पियन्स ट्रॉफी, टी२० वर्ल्ड कप जिंकला. पण आपल्या गुरुंना मात्र तो विसरल्याचे आता समोर येत आहे.रोहित शर्माकडून दिनेश लाड यांनी कधीही फी घेतली नाही. दिनेश लाड हे सर्वांनाच विनाशुल्क शिकवतात आणि खेळाडू घडवतात. ज्या मुलांची परिस्थिती बिकट आहे, पण गुणवत्ता ठासून भरलेली आहे अशा १५ होतकरु खेळाडूंना दिनेश लाड यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दत्तक घेतलं आहे. या मुलांसाठी त्यांना दहिसर येथे मैदानही मिळालं आहे. पण त्यासाठी त्यांना महिन्याचा खर्च हा ८-९ लाख एवढा येत आहे. दिनेश लाड सर मोफत शिकवतात, त्यामुळे त्यांच्या गाठीशी एवढी रक्कम नाही. पण रोहित शर्मासारखा नाव, प्रसिद्धी, पैसा अपाम कमावलेला खेळाडू हा त्यांना कोणतीच मदत करत नसल्याचे समोर आले आहे. रोहित शर्माला त्यावेळी दिनेश लाड यांनी सर्वतोपरी मदत केली, पण आता रोहित शर्मा मात्र आपल्या गुरुंनाच विसरल्याचे समोर आले आहे. रोहित शर्माच्या नावाचा स्टँड वानखेडे स्टेडियमवर झाला. पण या कार्यक्रमात रोहित शर्माने आपल्या गुरुंचं नावही घेतलं नाही. त्यामुळे रोहित शर्माला आपल्याला घडवणाऱ्या गुरुंचाच विसर पडल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली होती.युवा खेळाडूंना घडवण्यासाठी दिनेश लाड सरांची धावपळ सुरु आहे. पैसा कमावणे तर दूरच ते आपल्या खिशातमधून पैसे भरुन या खेळाडूंना घडवत आहेत. पण रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूला आपल्या गुरुंचाच विसर पडला, अशी खंत क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tDISRX6

No comments:

Post a Comment