मुंबई : भारताने इंग्लंडवर अविस्मरणीय विजय साकारला. इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयानंतर अजिंक्य रहाणेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या विजयात कोणता दुग्धशर्करा योग होता, हे अजिंक्य रहाणेने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला असला तरी भारताच्या गोलंदाजांची सुरेख साथ मिळाली. कारण भारताने जर २० विकेट्क काढल्या नसत्या तर भारताला विजय मिळवता आला नसता. खासकरून आकाश दीपने या सामन्यात १० बळी मिळवले आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर मोहम्मद सिराजनेही दमदार गोलंदाजी केली. पण या सामन्यात कोणता दुग्धशर्करा योग होता, हे अजिंक्य रहाणेने सांगितले आहे.अजिंक्य रहाणे म्हणाला की, " भारताने पाटा खेळपट्टीवर विजय मिळवला, असे म्हणून त्यांचे श्रेय कमी करण्याचा प्रयत्न काही जणं करतील. पण मला शुभमन गिलबाबत जी गोष्ट आवडली ती म्हणजे, त्याचं समर्पण, एकाग्रता आणि त्याची देहबोली. पहिला कसोटी सामना गमावलेला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत येऊन खेळणं सोपं नसतं. शुभमन गिलचं द्विशतक हे माझ्यामते सर्वात महत्वाचं ठरलं. कारण या द्विशतकाने संघाला विजयाची आशा दाखवली. गिलच्या द्विशतकामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. पण माझ्यामते शुभमन गिलने जे शतक दुसऱ्या डावात केले, तो मला दुग्धशर्करा योग वाटतो. "भारताला हा विजय कधीही विसरता येणार नाही. कारण आतापर्यंत एजबस्टनवर भारताला एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. पण शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने ही गोष्ट साध्य केली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताेन इतिहास रचला. भारतीय संघासाठी हा विजय महत्वाचा यासाठीही असेल कारण, भारताने मालिकेत आता १-१ अशी बरोबरी केली आहे आणि ते आता इंग्लंडच्या खांद्याला खांदा लावून उभे झाले आहेत. त्यामुळे आता तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आता तिसऱ्या कसोटी सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/itJAz4d
No comments:
Post a Comment