मुंबई- महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषा सक्तीच्या वादावर अभिनेता यानेही आता आपले मत व्यक्त केले आहे. तसेच या मुद्द्यावर हिंदी चित्रपट कलाकारांच्या मौनाबद्दल त्याने उघडपणे भाष्य केले. 'स्त्री' आणि 'श्रीकांत' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला राजकुमार म्हणाला की, प्रत्येक अभिनेत्याने प्रत्येक मुद्द्यावर बोलणे आवश्यक नाही आणि सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट न करणे म्हणजे त्यांना त्या मुद्द्याची पर्वा नाही असे होत नाही. राजकुमार म्हणाला की, कलाकार संवेदनशील असतात आणि सामाजिक मुद्द्यांनी प्रभावित होतात, परंतु सोशल मीडियावर सगळ्याच गोष्टी पोस्ट करणे आवश्यक नसते. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजकुमार म्हणाला की, कलाकारांनी ज्या मुद्द्यांबद्दल त्यांना खोलवर काहीतरी वाटते त्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे. ते म्हणाले, 'जर तुम्हाला एखाद्या मुद्द्याबद्दल प्रेम आपुलकी असेल तर तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे. परंतु, प्रत्येक मुद्द्यावर बोलणे आवश्यक नाही. सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट न करणे म्हणजे तुम्हाला त्याची पर्वा नाही असे नाही.' राजकुमारने संवेदनशीलतेवर भाष्य केले राजकुमार रावने प्रश्न उपस्थित केला की सोशल मीडियाने कधीपासून एखादी व्यक्ती संवेदनशील आहे की नाही हे ठरवण्यास सुरुवात केली. म्हणाला, 'जे लोक सोशल मीडियावर नाहीत त्यांना दुःख होत नाही का? त्यांना चांगल्या गोष्टींवर आनंद होत नाही का, आनंद आणि दुःख व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सोशल मीडिया आहे का? आम्हाला भावना नाहीत का?' विमान अपघाताची बातमी ऐकून राजकुमार राव रडलेला राजकुमार रावने यावेळी एक वैयक्तिक अनुभव शेअर केला आणि सांगितले की विमान अपघाताची बातमी ऐकून तो रडलेला, पण ते सोशल मीडियावर शेअर करणे त्याने आवश्यक मानले नाही, 'मी त्या अपघाताचे फोटो पाहिले आणि रडलो. ते सोशल मीडियावर टाकणे आवश्यक आहे का? ही एक वैयक्तिक भावना आहे. माझा असा विश्वास आहे की सोशल मीडियावर सर्वकाही टाकल्याने त्याची संवेदनशीलता कमी होऊ शकते.' मराठी-हिंदी मुद्दा? अलिकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माध्यम आणि सरकारी शाळांमध्ये हिंदीचा तिसरा भाषा म्हणून समावेश करण्यास विरोध केला होता. नंतर महाराष्ट्र सरकारने हा आदेश मागे घेतला. यावर मोठा गदारोळ सुरू आहे. यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनी परत एका मंचावर आलेले पाहायला मिळाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gE2oHQu
No comments:
Post a Comment