Breaking

Thursday, July 24, 2025

विमान कर्मचाऱ्याने टॉयलेट सीटखाली फोन लपवला अन्... चिमुकल्यांचे 'खाजगी' रेकॉर्डिंग, न्यायालयाने सुनावली अशी शिक्षा https://ift.tt/Vuc7m0W

वॉशिंग्टन : अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमान कर्मचाऱ्याने विमानातील टॉयलेटमध्ये लहान मुलींचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील आरोपी कर्मचाऱ्याला साडे अठरा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एस्तेस कार्टर थॉम्पसन असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने नऊ महिन्यांच्या कालावधीत सात वर्षांच्या लहान मुलींसह सुमारे पाच अल्पवयीन मुलींचे चित्रीकरण केल्याचे सांगितले. धक्कादायक म्हणजे या माध्यमातून त्याने बाल पोर्नोग्राफीचे व्हिडिओ जमा केले.बॉस्टनच्या यूएस जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जूलिया कोबिक यांनी थॉम्पसनला शिक्षा सुनावताना त्याचे हे कृत्य 'भयानक' असल्याचे म्हटले आहे. ज्याच्यामुळे 'चिमुकल्यांची निरागसता नष्ट होत आहे' असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, थॉम्पसनने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि ते 'स्वार्थी, विकृत आणि चुकीचे' कृत्य असल्याचे तो म्हणाला.संघीय सरकारी वकिलांनी सांगितले की, 'थॉम्पसन हा मुलांच्या शरीराचे त्यांच्या अत्यंत खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, आणि नंतर ते व्हिडिओ फाइल करुन ठेवत होता आणि नंतर एडिट करत होता. तर स्वतःच्या लैंगिक समाधानासाठी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत होता.' या कृत्यामुळे थॉम्पसनने 'पाच तरुण मुलींची निरागसता आणि जगाच्या चांगुलपणावरील विश्वास हिरावून घेतला आणि त्याऐवजी त्यांच्या मनात भीती, अविश्वास, असुरक्षितता आणि दुःख निर्माण केले.' असेही सरकारी वकील म्हणाले.घटना अशी की, सप्टेंबर २०२३ मध्ये बोस्टनला जाणाऱ्या विमानात थॉम्पसनला अटक करण्यात आली होती. त्याने एका १४ वर्षांच्या प्रवासी मुलीला वॉशरूममध्ये नेले आणि तेथे नेल्यावर टॉयलेट सीट तुटलेली असल्याचे सांगितले. त्याने मग तिला आपले हात धुण्यास सांगितले. मुलीला टॉयलेट सीटच्या खाली अंडर मेन्टेनन्स लिहिलेल्या स्टिकरखाली आयफोन आढळला. तिने त्याचा फोटो काढला आणि तिच्या पालकांनाही दाखवला. ही गंभीर बाब पालकांच्या लक्षात येताच त्यांनी जाब विचारसा. थॉम्पसन फ्लाइटमधील बाथरूममध्ये लपून बसला आणि त्याने आपल्या फोनमधील सर्व डेटा डिलीट केला. या घटनेनंतर त्याला तातडीने नोकरीवरून काढून टाकण्यात आले.तपासात उघड झाले की, थॉम्पसनच्या सूटकेसमध्ये अनेक मेंटेनन्स स्टिकर्स आहेत. त्याच्या आय क्लाउड अकाउंटची तपासणी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. त्यात इतर चार अल्पवयीन मुलींचे रेकॉर्डिंग आणि एका ९ वर्षांच्या मुलीचे तिच्या सीटवर झोपलेले फोटो तसेच मुलींची अनेक एआय-जनरेटेड लैंगिक चित्रं आढळली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PCbnQUv

No comments:

Post a Comment