Breaking

Thursday, July 24, 2025

सततची नापिकी अन् कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्य हवालदिल, शेतातच आयुष्याची दोर कापली; पंचक्रोशीत हळहळ https://ift.tt/X2rjWcf

अमोल सराफ, बुलढाणा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असताना शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बळीराजा या संकटाला तोंड देत आहे. तसेच सततची नापिकी आणि आर्थिक तोटा देखील गाठीशी आहेच. या सर्वांच्या बोजाखाली पिचलेल्या शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उललले आहे. स्वतःच्या शेतातच गुरुवारी दोन वेगवेगळ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शेतकरी दांपत्याने भर संध्याकाळी जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा सु्न्न झाला आहे. गणेश श्रीराम थुट्टे (५५) व रंजना थुट्टे (४७) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. चिखली तालुक्यातील भरोसा येथील रहिवासी असलेल्या थुट्टे यांच्याकडे आठ एकर शेती आहे. शेतीवरच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. अनेक अडचणींचा सामना करीत दोन मुली आणि मुलाचे लग्न केले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनही सुरू केले होते. मुलगा राजेश गॅरेजवर काम करायचा. सून शेळीपालनात हातभार लावत होती. शेती पिकविण्यासाठी पैसा लावण्यात येत होता. मात्र नापिकीमुळे उत्पादन होत नव्हते. भांडवल जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती होती. त्याचप्रमाणे बँकेचे कर्जही त्यांच्यावर होते. त्यामुळे या सर्वाला कंटाळून शेजारी-शेजारीच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन दाम्पत्याने जीवनयात्रा संपवली.मात्र या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल का उचललं याबाबत याचे कारण समोर येऊ शकलेले नाही. मात्र सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हुमणी अळी यासारखे संकटं यामागे कारणे असू शकतात अशी परिसरात चर्चा आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अंधेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई करत आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून तूर्तास याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सततची नापिकी कर्जबाजारीपणा आणि हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी स्थिती सुधारेल या आशेवर बळीराजा सतत राबत असतो पण मागील काही वर्षांपासून त्यांच्या हाताशी सतत निराशाच येत आहे आणि यातून अशा घटना पुढे येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cnd9rZw

No comments:

Post a Comment