Breaking

Sunday, March 28, 2021

करोना लसीकरण: 'आजार असलेल्यांना वयाची अट कशाला?' https://ift.tt/3frjZ99

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर प्रादुर्भावाला रोखायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हे करताना लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना किमान आजारग्रस्त असलेल्यांसाठी वयाची अट शिथिल केली पाहिजे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना लसीकरण करण्यात येत आहेत. येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा वेग चांगला आहे; मात्र, त्याचवेळी आजारग्रस्तांसाठी असलेली वयाची अट अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांत आहे. कधीकाळी मधुमेहासारखे आजार वयाच्या पन्नाशीनंतर आढळत होते. जसजशी जीवनशैली बदलत गेली त्यानंतर वयाच्या ४५च्या पुढे हा आजार आढळू लागला. आता हे वय आणखी खाली आले आहे. त्यामुळे ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीलाही किंवा हृदयाचा त्रास असू शकतो. ४५च्या आत बायपास झालेल्यांची संख्याही मोठी आहे. मग अशा व्यक्तीने लसीकरणासाठी वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहायची, हे चुकीचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. हळूहळू देशातील सर्वच नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असले तरी ठरविलेल्या प्राधान्यक्रमात आजारग्रस्तांसाठी वयाची अट घालणेच चुकीचे आहे. आजार वय पाहून होत नाही. त्यामुळे गंभीर आजार असलेल्यांसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करावी, अशी मागणी होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sArwWQ

No comments:

Post a Comment