म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई काही दिवसांपूर्वी यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे चर्चेत आलेल्या यांनी मंगळवारी पुन्हा नवे वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री यांना भर विधानसभेत तुमच्यात मुख्यमंत्री (सीएम मटेरियल) होण्याची क्षमता आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटल्याने विधिमंडळात दिवसभर चांगलीच चर्चा रंगली. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विदर्भ विकास वैधानिक महामंडळाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करीत राज्य सरकारवर टीका केली होती. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहार प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत असल्याचा आरोप केला. जवळपास १५ महिने उलटून या अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाईही झालेली नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यावर शिंदे यांना उद्देशून तुम्ही 'सीएम मटेरिअल' आहात. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका, असे मुनगंटीवार म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bXsLIM
No comments:
Post a Comment