मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटात दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. काल रात्री पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे.तसंच, शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. सर्व कार्यक्रम रद्द पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. पण प्रकृती अस्वस्थेमुळं शरद पवारांना रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत. तर लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3swsG5R
No comments:
Post a Comment