Breaking

Saturday, March 27, 2021

'ट्राय'चा इशारा; 'एलआयसी'सह या बड्या बँंकांची SMS सेवा होणार बंद, हे आहे कारण https://ift.tt/3fkjvSq

नवी दिल्ली : मोबाइलधारकांना (Bulk SMS) पाठविणाऱ्या कंपन्यांविरोधात दूरसंचार नियामकाने (TRAI) आता कठोर पावले उचलली आहे. वारंवार सूचना देऊनही बल्क एसएमएस सेवा सुरूच ठेवणाऱ्या देशभरातील ४० डिफॉल्टर कंपन्यांची यादी जारी केली आहे. या कंपन्यांनी ३१ मार्च अखेर नियमांचे पालन केले नाही तर एप्रिलपासून एसएमएस सेवा खंडीत करण्याचा इशाराच दूरसंपर्क नियमकाने दिला आहे. बल्क एसएमएस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० कंपन्यांमध्ये आघाडीच्या बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा समावेश आहे. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक या प्रमुख बँकांचा समावेश आहे. या बँकांना आणि एलआयसीला नविन नियमांचे पालन करण्यासाठी ट्रायने ३१ मार्च २०२१ ची डेडलाईन दिली आहे. वित्त सेवा देणाऱ्या कंपन्या आणि टेली मार्केटिंग कंपन्यांना नवीन नियमावलीची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच पुरेसा कालावधी दिला होता. मात्र अजून ४० कंपन्यांनी त्याची पूर्तता केलेली नाही, असे दूरसंपर्क नियमकाने म्हटलं आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२१ पर्यंत त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर १ एप्रिलपासून या कंपन्यांची एसएमएस सेवा बंद केली जाईल, असे ट्रायने म्हटलं आहे. एक एप्रिलपासून एसएमएसमध्ये नियमावलीचे पालन केलेले नसेल असे एसएमएस रोखले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. व्यावसायिक उद्देशाने मेसेज करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे मेसेज हेडर आणि टेम्पलेट दूरसंचार ऑपरेटरकडे नोंद करावे लागतील. त्यानंतर कंपनी , पेमेंट कंपन्या आणि इतरांना जेव्हा असे एसएमएस जातील तेव्हा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर त्याची टेम्पलेटवरुन छाननी केली जाणार आहे. विशेषतः आर्थिक सेवांचे , आर्थिक लाभाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एसएमएस सेवेला यामुळे चाप बसणार आहे. दूरसंचार नियमकाने स्क्रबिंग डेटा आणि एसएमएस स्क्रबिंगबाबत टेली मार्केटिंग कंपन्या आणि मध्यस्थ सेवा पुरवठादार यांच्याशी २५ मार्च २०२१ रोजी चर्चा केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ct3nMm

No comments:

Post a Comment