Breaking

Thursday, April 1, 2021

मुंबई महापालिकेच्या 'तिजोरी'ची चावी शिवसेनेकडेच? https://ift.tt/3rCYIfe

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई पालिकेतील आर्थिक सत्तास्थान असलेल्या स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या वैधानिक समिती अध्यक्षपद निवडणुकांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पालिकेत शिवसेनेचे बहुमत असून या सर्व समित्यांवर पुन्हा शिवसेनेचे उमेदवार सहज निवडून येतील, असे चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुका ५ एप्रिलला होणार आहेत. त्यापैकी स्थायी, शिक्षण, सुधार समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी, बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. त्यात सर्वांत प्रबळ आणि पालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेने यशवंत जाधव यांना तब्बल चौथ्यांदा संधी देण्याचे ठरविले आहे. त्यापाठोपाठ सुधार समिती अध्यक्षपदासाठी सदानंद परब यांना सलग तिसऱ्यावेळी संधी दिली आहे. पालिकेच्या चार वैधानिक आणि सहा विशेष समित्यांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी स्थायी समितीसाठी शिवसेनेचे यशवंत जाधव, शिक्षण समितीसाठी दुसऱ्यांदा संध्या दोशी यांनी, तर सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बेस्ट समितीसाठी शिवसेनेकडून आशीष चेंबूरकर यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून स्थायी समितीसाठी राजश्री शिरवडकर, शिक्षण समितीसाठी पंकज यादव, सुधार समितीसाठी स्वप्ना म्हात्रे, बेस्ट समितीसाठी प्रकाश गंगाधरे यांनी अर्ज भरला आहे. काँग्रेसकडून स्थायी समितीसाठी आसिफ झकेरिया, सुधार समितीसाठी अश्रफ आझमी यांनी, तर बेस्ट समितीसाठी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अर्ज दाखल केला आहे. वैधानिक समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने अर्ज भरले असले तरी ऐनवेळेस अर्ज मागे घेऊन शिवसेनेस पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून तीच समीकरणे पालिकेतल्या निवडणुकीतही दिसणार असल्याचे सांगितले जाते. पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचे अनेकदा दिसून आले. वैधानिक समिती अध्यक्षपदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे पक्षीय बलाबल लक्षात घेता शिवसेनेस ही निवडणूक सहजसोपी ठरणार आहे. यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी फेब्रुवारी २०१७च्या पालिका निवडणुकीत शिवसेनकडून ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांना महापौरपद मिळेल, असा अंदाज बांधला गेला होता. तेव्हा शिवसेनेने महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड केली होती. त्यावेळेस नाराज झालेल्या यशवंत जाधव यांना सभागृह नेतेपद देण्यात आले आणि स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांची वर्णी लागली. त्यानंतर वर्षभरातच जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचे ठरविण्यात आले. त्यावेळेपासून जाधव यांना सलग चौथ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी संधी दिली गेली आहे. यापूर्वी शिवसेनेकडून रवींद्र वायकर आणि राहुल शेवाळे यांची प्रत्येकी चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. समित्यांमधले पक्षीय बलाबल पक्ष स्थायी शिक्षण सुधार बेस्ट ११ ९+२ (स्वीकृत नगरसेवक) ११ ७ भाजप १० ८+१ १० ६ काँग्रेस ३ ३+१ ३ २ राष्ट्रवादी १ १ १ १ सपा १ १ १ ०


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dtIKyS

No comments:

Post a Comment