म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनासंकटात सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. पण त्यामध्येही सकारात्मक कामे करण्यासाठी अनेकजण झटत असून आधार होत आहेत. अशांपैकीच एक करोनाग्रस्तांसाठी शोधणारे कार्यकर्ते म्हणजे . दाते हे मागील जुलैपासून अव्याहतपणे यासाठी काम करीत आहेत. करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी प्लाझ्मा उपचार अनेकदा महत्त्वाचे ठरतात. परंतु हे शोधणे हे कठीण काम असते. करोनावर मात केलेले रुग्णच त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा देण्यासाठी पात्र असतात. त्यामुळेच त्यांचा शोध घेणे व अशा रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करणे, अवघड असते. त्यासाठीच विश्वास दाते झटत आहेत. विश्वास दाते यांनी सांगितले की, 'मागीलवर्षी मे महिन्यात एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून केंद्र सरकारच्या योजनेत मोफत प्लाझ्मा मिळत असतानाही दीड लाख रुपये उकळल्याचे कळले. तिथूनच मी ही मोहिम सुरू करण्याचे निश्चित केले. मी आधीपासून रक्तदान क्षेत्रात कार्यरत होतोच. त्यामुळेच आता प्लाझ्मादात्यांना शोधण्याचे काम सुरू केले. परंतु याबाबत कुठलीही ठोस अशी प्रशासकीय रचना कार्यरत नसल्याने ते शोधणे खूप अवघड जाते. पण निकराने प्रयत्न सुरू आहेत.' दाते यांना मे महिन्यात घटना कळल्यानंतर त्यांनी दोन महिने या प्रकरणाचा कसून अभ्यास केला. त्यानंतर जुलै २०२० पासून हे काम सुरू केले. आतापर्यंत जवळपास ९०० करोनाग्रस्तांना त्यांनी प्लाझ्मा मिळवून दिला आहे. त्याशिवाय मागील वर्षभरात लॉकडाउनमुळे रक्तदातेही मिळत नव्हते. तेव्हा ७७६ दात्यांना त्यांनी रक्तदानासाठी तयार केले आहे. सध्याच्या लाटेत आव्हान सध्याच्या करोना लाटेत प्लाझ्मादाते मिळविण्यात काहीशी अडचण येत आहे. त्यामुळे दाते हे लाट सुरू झाल्यापासून करोनामुक्त झालेल्यांची यादी गोळा करीत आहेत. त्यानुसार अक्षरश: एकेका दात्याशी बोलून त्याला प्लाझ्मादान करण्यासाठी तयार करीत आहेत. सध्या लाटेच प्रभाव अधिक असल्याने दानकर्ते कमी मिळत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gCVEOu
No comments:
Post a Comment