Breaking

Saturday, April 24, 2021

मासिक पाळी दरम्यान लस घ्यावी का? https://ift.tt/3axQUFV

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी एक मे पासून लसीकरण सुरू होत आहे. मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा खोटा, अशास्त्रीय दावा टाकणारा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरामध्ये अनेक बदल होतात हे सत्य असले तरीही या कालावधीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते, यात कोणतेही तथ्य नाही, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव- गांधी यांनी सांगितले आहे. प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक आनंद यांनीही अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही याकडे लक्ष वेधले आहे. मासिक पाळीमध्ये औषधे घेऊ नयेत वा लस घेऊ नये, असे कुठेही नमूद केलेले नाही. लशीमुळे करोनापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dMH7h6

No comments:

Post a Comment